पंचवटी (जि. नाशिक) : गेल्या पंचवीस दिवसांपासून पावसाची संततधार (Constant rain) सुरू होती. मंगळवारी (ता. २६) पावसाने उसंत घेतली होती. यात रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारक व पादचारी उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त होत आहेत. (citizens suffering due to reduced respiratory capacity due to dust on road nashik latest marathi news)
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे शहरात रस्त्याचे पितळ उघडे पडले. दिंडोरी पेठ रोड, मखमलाबाद रोड, मुंबई- आग्रा महामार्ग, औरंगाबाद रोड आणि तसेच पंचवटी विभागातील रिंग रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते.
मनपाने तात्पुरती मलमपट्टी खड्डे खडी, मुरूमाने भरले. परत पाऊस पडला की पुन्हा खड्डा मग त्यावर पुन्हा मलमपट्टी. यात रस्त्यावर मुरुमाची माती पसरली. मंगळवारी पावसाने उसंत घेतली. याच पसरलेल्या मुरुमाच्या मातीचे धुळीत रूपांतर झाले.
त्याचा त्रास हा रस्त्यावरून मार्गक्रमण करणारा वाहनधारकांना होत आहे. धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यानंतर धूलिकण श्वसनसंस्थेत जमा होतात. श्वसनातून शरीरात, फुप्फुसात, श्वसननलिकेत जातात. अॅलर्जीचा त्रास असणाऱ्यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर काहींना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. या धूलिकणाचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होत जाणे होय.
"पाऊस थांबला असल्यामुळे महानगरपालिकेने मुरूम टाकून जे खड्डे बुजविले आहे .ती सर्व मुरूम माती रस्त्यावर येऊन नागरिकांच्या डोळ्यास व श्वसनास त्रासदायक ठरत आहे.मुळात मनपा प्रशासनाने खड्डे पडणार नाहीत असे रस्ते करावे.नाहीतर किमान खड्डे बुजविताना पुढे धुळीचा सामना करावा लागणार नाही ,अशा स्वरूपात खड्डे बुजवावेत. "
- रवी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते,
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.