वायझॅक शहराला भेट देणारे क्रेडाई नाशिक मेट्रोचे पदाधिकारी esakal
नाशिक

सिस्टरसिटी वायझॅकने नाशिकला मागे टाकले

विक्रांत मते

नाशिक : नाशिकची सिस्टरसिटी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम अर्थात वायझॅक (Vizag) शहराने विकासाच्या दृष्टीने मागील दहा वर्षांत नाशिकला मागे टाकत आघाडी घेतली आहे. येथील दरडोई उत्पन्नात दहा वर्षांत दुप्पटीने वाढ झाली असून, सध्या दरडोई उत्पन्न जवळपास दीड लाख रुपये आहे, तर नाशिकचे दरडोई उत्पन्न ५५ ते ६० हजार आहे. विकासाचे उद्दिष्ट निश्‍चित करून त्यादृष्टीने केलेले प्रयत्नांचा हा भाग असून, राजकीय महत्त्वकांक्षा विकासासाठी महत्त्वाची ठरल्याची बाब नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

देशभरात स्मार्टसिटी बनविण्याचे वारे सुरू झाले त्या वेळी शहरांच्या एकसमान गुणांचा विचार करून सिस्टरसिटी करार केले जाऊ लागले. त्याकाळात आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (आत्ताचे वायझॅक) व नाशिक या दोन शहरांमध्ये हवामान वगळता शहराचे आकारमान, दरडोई उत्पन्न, पायाभूत सुविधांच्या बाबतीत एकसमानता होती. त्यामुळे दोन्ही शहरांना सिस्टरसिटी संबोधले गेले.

२०१६ दरम्यान नाशिक व विशाखापट्टणम महापालिकांमध्ये सिस्टरसिटी करार करण्यास मान्यता देण्यात आली. परंतु नाशिक महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने करार होऊ शकला नाही. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी देखील प्रस्ताव सादर केला होता. परंतु महासभेच्या पटलावर विषय सादर झाला नाही.

क्रेडाईच्या सदस्यांनी नुकताच विशाखापट्टणम शहराचा दौरा केला. समुद्रकिनाऱ्यानजिक असलेल्या व डोंगरावर वसलेल्या या शहराचा दौरा केल्यानंतर या शहराची प्रगती डोळे दीपविणारी ठरल्याचा दावा करण्यात आला.

नाशिकशी साम्य असलेल्या या शहराचे दरडोई उत्पन्न एक लाख ४० हजारांच्या आसपास आहे, तर नाशिकच्या दरडोई उत्पन्नात अद्यापही फारसा फरक पडला नाही. नाशिकचे दरडोई उत्पन्न ५५ ते ६० हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र सध्या नाशिकचा विकास दर उंचावत असल्याने व विकासाचा दर कायम राहिल्यास दरडोई उत्पन्नात दुप्पट वाढ होण्याचा दिवस दूर नसल्याचे दिसून येत आहे.

दहा वर्षांत तेथील सरकारने विशेष लक्ष देऊन पायाभूत सुविधा पुरविल्याने विकास साध्य झाला आहे. एअर कनेक्टिव्हिटी, रेल्वे विस्तारामुळे प्रगतीने वेग घेतला. विकासाचे उद्दिष्ट साध्य करताना स्वच्छता व सौरऊर्जानिर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात आल्याची बाब अधोरेखित करण्यात आली.

नाशिकमध्येही हवेत आयटी उद्योग

विशाखापट्टणम ते वायझॅकमध्ये रुपांतरीत होण्याच्या प्रवासात माहिती व तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची पायाभरणी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. तत्कालीन सरकारने आयटी उद्योगांसाठी मोफत जमीन देताना करांमध्ये देखील सवलती दिल्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या प्रगतीसाठी देखील आयटी उद्योगांची आवशक्यता असून, त्यासाठी शासनाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर औषधनिर्मिती उद्योगांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाल्याने विकासाला ही बाब कारणीभूत ठरली. नाशिकचे हवामान औषध व्यवसायांना पूरक असल्याने उद्योग स्थापनेसाठी प्रयत्न झाल्यास दरडोई उत्पन्नात वाढ शक्य आहे.

आता कन्सल्टन्सीचा व्यवसाय

शहरांच्या विकासासाठी मॅनेजमेंट व आयटी उद्योग आणण्यासाठी कन्सल्टन्सीचा नवा उद्योग या शहराने सुरू केला असून, देशभरातील इतर शहरांना विकासाचे धडे देण्याचे काम आता येथे सुरू झाले आहे. त्यासाठी ठराविक फी आकारून शहराचे उत्पन्न वाढविले जात आहे.

नाशिकमध्ये फिनटेकची निर्मिती

वायझॅकमध्ये आयटी उद्योगांची स्थापना करताना तेथे फायनान्स व टेक्नॉलॉजी सर्विसेस अर्थात फिनटेक व्हॅली ही नवी संकल्पना अमलात आणली आहे. त्यासाठी त्या शहरातील तज्ज्ञ जगभर फिरले. जे तंत्रज्ञान शिकले त्यांनी इतरांना प्रशिक्षित केले. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई या शहरांत देखील या सुविधा नाही त्या वायझॅक शहरात तयार झाल्या. त्यातून रोजगारनिर्मिती झाली. उत्पन्न वाढले. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये या सेवा आणण्याचा क्रेडाईचा प्रयत्न असल्याचे क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पाणी व गॅसमीटर बसवावे

वायझॅकप्रमाणेच नाशिकमध्ये आयटी उद्योगांची निर्मिती होणे गरजेचे आहे. आयटी उद्योगांसाठी आंध्र प्रदेश सरकारने मोफत FSI दिला. इमारतीच्या उंचीला मर्यादा नाही; परंतु सामासिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. इमारतीच्या बेसमेंटरला पार्किंग, एसटीपी प्लान्ट बंधनकारक करण्यात आले. रस्ते, फुटपाथ, उद्याने, वॉकवे, सायकल ट्रॅक, स्वच्छता यावर बारकाईने अभ्यास करून नियोजन करण्यात आले. पाणी व गॅस पाइपलाइनसाठी मीटर बसविण्यात आले. यातून गळती थांबविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर नाशिक शहरातदेखील मीटर बसविले जावे, यासाठी महापालिका आयुक्तांना क्रेडाईचे प्रतिनिधी भेटणार असल्याची माहिती क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली.

आयटी उद्योग महत्त्वाचा

कुठल्याही शहराची आर्थिक प्रगती ही कारखाने, कंपन्यांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या रोजगारामुळे होते. नाशिकमध्ये माहिती व तंत्रज्ञानावर आधारित उद्योग आल्यास वेगाने प्रगती होईल. वायझॅक शहरात तेथील सरकारने विशेष लक्ष देऊन आयटी उद्योग आणले. अडचणी निर्माण होणार नाही, अशा प्रकारे नियमांची बांधणी केली. फक्त रोजगारावरच लक्ष केंद्रित केले नाही, तर स्वच्छतेबाबत जनजागृती करून लोकांना देखील सहभागी करून घेतले. त्याच धर्तीवर नाशिकचा विकास अपेक्षित असल्याचे क्रेडाईचे सहसचिव अनिल आहेर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT