Nylon Manja esakal
नाशिक

Nashik Crime News: नायलॉन मांजा प्रकरणी शहर पोलिस आक्रमक! साठा करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मकरसंक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पतंग उडविले जातात. मात्र पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर केला जात असल्याने त्याविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही चोरी-छुप्यारीतीने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू केली आहे.

परंतु नायलॉन मांजाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्यांवरही कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होते आहे. विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. परंतु साठा करणारे मात्र नामानिराळे राहात असल्याने, असा साठा करणाऱ्यांचीही माहिती घेऊन कठोर कारवाईचे संकेत शहर पोलिसांनी दिले आहेत. (City Police Aggressive in Nylon Manja Case Strict action will taken against sellers Nashik Crime News)

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांसह नागरिकांनाही त्रास होतो आहे. या मांजामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पशुपक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही दुचाकीचालकांच्या गळ्यांना गंभीर इजाही या नायलॉन मांजामुळे झाल्या आहेत.

त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहर आयुक्तालयातर्फे नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही दर वर्षी या नायलॉन मांजा विक्रेत्यांकडून चोरी-छुप्या विक्री केली जाते. अशा विक्रेत्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले गेले. तर गेल्या वर्षी काही विक्रेत्यांवर तडीपारीचीही कारवाई केली होती.

अशी कठोर कारवाईनंतर गेल्या आठवड्याभरात नाशिकमधील भद्रकाली, अंबड, पंचवटी, इंदिरानगर या परिसरात नायलॉन मांजा प्रकरणी विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिस आयुक्तांनीच कठोर भूमिका घेतल्याने येत्या काळात आणखीही व्रिकेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

साठेबाज मात्र नामानिराळे

नायलॉन मांजा प्रकरणी शहर पोलिसांकडून विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र नायलॉन मांजाचा साठा करून विक्रेत्यांना विकणारे मात्र या कारवाईपासून नामानिराळे राहत आहेत.

भद्रकाली, अंबड आणि सातपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा साठा करणारे व्यापारी असून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली तर शहरातून नायलॉन मांजाच गायब होऊ शकतो. त्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली तर अनेक पशुपक्ष्यांचे जीव वाजू शकतील.

"नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. साठा करणाऱ्यांचाही पोलिस शोध घेत असून, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल."

-प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT