combing operation by city police esakal
नाशिक

Police Combing Operation : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कोम्बिंगचा उतारा; पोलिसांची रात्रभर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली होती. भरदिवसा गोळीबारी अन्‌ तलवारी-कोयत्याने हल्ल्याच्या घटनांनी शहर पोलिसांचा (Police) धाकच नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. (city police conducted combing operation from Monday 27 march night to Tuesday 28 march morning nashik news)

त्यामुळे खडबडून जाग आलेल्या शहर पोलीसांनी सोमवारी (ता. २७) रात्रीपासून मंगळवारी (ता.२८) पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवून ‘गुन्हेगारी’वर उतारा केला. यात टवाळखोरांसह सराईत गुन्हेगारांची चेकिंग करण्यात आली.

तर वारंट बजाविण्यात आलेल्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, गुन्हेगारांविरोधातील कठोर उपाययोजना यापूर्वीच करण्यात आल्या असत्या तर गुन्हेगारीने डोके वर काढले नसते अन्‌ पोलिसांचाही वचक राहिला असता, अशी चर्चा नाशिककरांमध्ये आहे.

पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये एका पाठोपाठ गोळीबारीच्या घटना, त्यातही सातपूरमध्ये भरदिवसा तर अंबडमध्ये भरदिवसा तलवारीने व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला यासारख्या घटनांनी सुस्तावलेल्या शहर पोलिसांवर चौहुबाजूने टीकेची झोड उठली होती. त्याच हिवाळी अधिवेशनात नाशिकमधील पोलिसिंगविरोधात तक्रारींचा पाढा लोकप्रतिनिधींनी वाचला होता.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

त्यानंतरही शहरातील गुन्हेगारीला आळा बसू शकला नाही. तर दोन दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी वाढत्या गुन्हेगारीविरोधात चिंता व्यक्त करीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. यामुळेच खडबडून जाग आलेल्या शहर पोलिसांनी सोमवारी (ता. २७) रात्रीपासून ते मंगळवारी (ता. २८) पहाटेपर्यंत आयुक्तालय हद्दीमध्ये रात्रभर गुन्हेगारांविरोधातील कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली शहरभर कोम्बिंग ऑपरेशन राबविले गेले. पोलीस ठाणे निहाय असलेल्या सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीसीटर, तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.

शहरातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये एकाचवेळी करण्यात आलेल्या या ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचेही धाबे दणाणले. गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी आणि शहर गुन्हेशाखेचे पथकांकडून गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला.

- कोम्बिंग ऑपरेशन :

सराईत गुन्हेगारांची तपासणी : १५७

हिस्ट्रीशीटर : ९०

तडीपारांची तपासणी : ३६

टवाळखोरांवरील कारवाई : २९

अजामिनपात्र वॉरंट कारवाई : ११

हत्यारधारी संशयित : १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT