Rickshaw traffic esakal
नाशिक

Traffic Problem : बेशिस्त रिक्षाचालकांमुळे शहराची दैना; वाहतूक पोलिसांकडून सर्रास दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एकीकडे दुचाकीस्वारांवर हेल्मेटसक्तीचा बडगा उगारला जात असताना दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकांना बेशिस्त रिक्षाचालकांनी विळखा घातला आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये जास्तीची भरच पडते आहे.

विशेषतः या चौकांमध्ये कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षाचालक मुजोरी करतानाचे चित्र सर्वसामान्य रोजच अनुभवत असतात.

त्यामुळे चौकात वाहतूक पोलिस नावालाच राहिले तर, रिक्षाचालक भररस्त्यात बेशिस्तीने रिक्षा थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असतात. (City Traffic Problem due to undisciplined rickshaw pullers General neglect by traffic police nashik news)

सीबीएस, शालिमार चौकात वाहतूक पोलिस शाखेची चौकी आहे. या ठिकाणी किमान चार ते पाच वाहतूक पोलिस नियमित कर्तव्यावर असतात. परंतु, असे असतानाही शालिमारकडे जाणाऱ्या आणि शालिमारकडून येणाऱ्या मार्गावर बेशिस्त रिक्षाचालकाच्या रिक्षा थांबलेल्या असतात.

अगदी पोलिस चौकीपासून ५० फुटांवरचे असे चित्र नियमित झाले आहे. त्यामुळे शालिमारकडे जाताना आणि येताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच शहर बस या मार्गावर आली तर वाहतूक कोंडी होऊन सिग्नल यंत्रणाच कोलमडून पडते.

मात्र, तरीही वाहतूक पोलिस मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करीत नाहीत. अशीच स्थिती शरणपूर रोडकडून सीबीएससमोर असते. सजग वाहनचालकाने वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली तर उलट त्यालाच वाहतुकीचे नियम पोलिस शिकवितात. त्यामुळे तोही आल्या मार्गे निघून जाण्यात धन्यता मानतो.

शालिमार चौकात रिक्षाचालकाच्या बेशिस्तपणाचा कहरच आहे. वाहतूक पोलिस याठिकाणी थांबत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढली असून सर्वसामान्य यामुळे हैराण झाले आहेत.

रविवार कारंजा, मालेगाव स्टॅन्ड

रविवार कारंजा चौकात तर रोजची वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यालगतचे बाजार, हातगाड्या, भाजी विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतुकीला रस्ता अरुंद होऊन जातो. पंचवटीकडून येणारी वाहतुकीला रविवार कारंजा चौकातच थांबलेल्या रिक्षाचा अडथळा होतो.

प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालक एका रांगेत न थांबता दोन-तीन रिक्षा रस्त्यावर थांबतात. परिणामी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा होळकर पुलापर्यंत लागतात. तर, मालेगाव स्टॅन्ड येथे गोदाघाटाकडे जाणाऱ्या वळणावरच रिक्षा थांबतात. त्यामुळे निमाणीकडून येणाऱ्या वाहनांना या रिक्षाचा अडथळा निर्माण होतो.

ठक्कर बाजार

त्र्यंबक रोडवरील ठक्कर बाजार आणि ठक्कर बाजाराकडून मेळा बसस्थानकाकडे जाणाऱ्या अर्धा रस्ता बेशिस्त रिक्षाचालकांनी व्यापलेला असतो. त्यामुळे मेळाबसस्थानक मार्गावर समोरासमोरून दोन बस आल्या तर वाहतूक कोंडी निर्माण होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मात्र रिक्षाचालक त्याची रिक्षा मार्गावरून हलवित नाही. त्यातच भर पडते ती निरीक्षणगृहाच्या भिंतीलगत व ठक्कर कॉम्प्लेक्सच्या बाजूने पार्क केलेल्या चारचाकी कारची. टोइंग करताना कार पाहून टोइंग केली जाते.

बसथांबे बनले रिक्षाथांबे

त्र्यंबक रोडवरील सिव्हिल बसथांबा, शालिमार बसथांबा, स्मार्ट रोडवरील मेहेर बसथांबा यासह शहरातील अनेक ठिकाणी शहर बसेसचे थांबे आहेत. परंतु या बसथांब्यांना रिक्षांचाच गराडा पडलेला असतो. त्यामुळे सदरील थांबे हे बसचे की रिक्षांचे हेच कळेनासे होते.

तसेच, अशोकस्तंभ चौक, सीबीएस चौक यासह अनेक चौकांमध्ये ठराविक रिक्षांसाठी थांबे असताना, त्या ठिकाणी त्यापेक्षाही अधिक रिक्षा अस्ताव्यस्त थांबलेले असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झालेली असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT