Civil Hospital esakal
नाशिक

Nashik Civil Hospital : निरीक्षकाअभावी सिव्हिलची स्वच्छता ‘रामभरोसे’

सकाळ वृत्तसेवा

Nashik Civil Hoaspital : जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छता निरीक्षकपद रिक्त आहे. स्वच्छता निरीक्षक नसल्याने जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याच्या तक्रारी आहेत.

परंतु, त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेची समस्या नेहमीच चर्चेचा विषय ठरत असून, रुग्णांनाही अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. (civil hospital post of sanitation inspector is vacant for last six months in district government hospital nashik news)

जिल्हा शासकीय रुग्णालय हे सुमारे ७५० खाटांचे रुग्णालय आहे. याठिकाणी जिल्ह्यातूनच नव्हे, तर परजिल्ह्यांतूनही दररोज हजारो रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी येत असतात. सर्वसामान्य आणि आदिवासी भागातून येणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळतात. परंतु, स्वच्छतेच्या नावाने मात्र येथे नेहमीच ओरड असते.

स्वच्छता कर्मचारी नेमून दिलेली कामे करताना कामचुकारपणा करतात. स्वच्छता निरीक्षक नसल्याने हे कर्मचारी मुकादमाला जुमानत नाहीत. रुग्णालय प्रशासनाकडूनही याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही फावते आहे. परंतु, त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील नियमित स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्हा रुग्णालयात वर्ग चार अंतर्गत ५८ स्वच्छता तथा सफाई कर्मचारी आहेत. याशिवाय, ७५ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचीही भरती करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांवर मुकादमाची नेमणूक केलेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु, मुकादम हेही स्वच्छता कर्मचाऱ्यांमधीलच एक कर्मचारी असल्याने कर्मचारी जुमानत नाहीत. याबाबत अनेक विभागांकडून रुग्णालय व्यवस्थापनाच्या कार्यालयीन अधीक्षकांकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता रामभरोसे असल्याचेच चित्र आहे.

पाठपुराव्याची आवश्यकता

मलेरिया विभागातील वर्ग तीनचा कर्मचारी जिल्हा रुग्णालयात स्वच्छता निरीक्षक म्हणून नेमला जातो. त्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित मलेरिया विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो. परंतु, जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात उदासीनता असल्याचे समोर येते आहे. त्यामुळे स्वच्छता निरीक्षकपद रिक्त असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT