Fighting between two women at Pimpalgaon Baswant-Toll Plaza  esakal
नाशिक

Nashik : पिंपळगांव टोल प्लाझावर 2 महिलांमध्ये Freestyle

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पथकर भरण्याच्या कारणाहुन व टोल प्लाझावरील महिला कर्मचाऱ्यांच्या उर्मट वर्तनावर सतत वादाची किनार असलेल्या पिंपळगाव टोल प्लाझावर पुन्हा राडा झाला. दोन महिलांमध्ये तुंबळ युद्ध जुंपले. अखेर हा वाद पोलिस ठाण्यात पोहचला व नंतर दोन्ही महिलांनी माघार घेत त्यावर पडदा पडला. (clash between female employee police wife at pimpalgaon toll booth nashik latest marathi news)

मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव शहरालगतच्या टोल प्लाझावर आंदोलने, वाहनचालक व कर्मचाऱ्यांमध्ये चकमकी हे नित्याचे झाले आहे. वादाच्या या मालिकेचा पुढचा अंक आज दिसला. वाहनातील महिला व टोल प्लाझावरील महिला कर्मचाऱ्यांत कर भरण्यावरून सुरवातीला शाब्दिक चकमक झाली.

वाहनातील महिला या केद्रीय राखीव दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नी होत्या. मालेगावहून मुंबईला जात असताना लेन क्र. पंधारमध्ये पथकर भरण्यावर वादाची ठिणगी पडली. नंतर हा वाद वाढला अन् प्रकरण हातघाईवर गेले. दोन्ही महिलांनी आक्रमक होत हाणामारी सुरू केली.

उपस्थितांनी मध्यस्थी केली. दोन्ही महिलांनी परस्परांवर हल्ला चढविला. प्रकरण पिंपळगाव पोलिस ठाण्यात पोहचले. पण तेथे दोन्ही महिलांनी गैरसमजातून वाद झाल्याचे मान्य करत वाद मिटला. दरम्यान, दोन्ही महिलांच्या हाणामारीमुळे पिंपळगांव टोल नाका पुन्हा वादात सापडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT