fund sakal
नाशिक

Nashik News: निधी वाटपावरून आमदार अन् प्रशासनात संघर्ष; मोठे रस्ते कामासाठी निधी खर्चाचे नियोजन

उड्डाणपुलांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी आता उड्डाणपूल रद्द होत असल्याने अन्यत्र विकासकामांसाठी वळविला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: उड्डाणपुलांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी आता उड्डाणपूल रद्द होत असल्याने अन्यत्र विकासकामांसाठी वळविला जाणार आहे. परंतु प्रशासनाकडून विभागनिहाय निधी वाटपाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे, तर दुसरीकडे प्रशासकीय राजवटीत आमदारांना ते सांगतील तेथे निधी देण्याचे नियोजन हवे असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधी आमदारांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या वतीने मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौक यादरम्यान दोन उड्डाणपूल तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. जवळपास दोन्ही उड्डाणपुलांसाठी २४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

मात्र एकाच वेळेस एवढी रक्कम अंदाजपत्रकात तरतूद न करता जवळपास २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र दीड वर्षे उलटले तरी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले नाही. (Clash between MLA and administration over fund allocation nashik news)

महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना मायको सर्कल उड्डाणपूल तयार करण्याचा प्रस्ताव समोर आला. त्यात पाठोपाठ सिडकोत देखील उड्डाणपुलाची गरज असल्याचे दर्शवून त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौक यादरम्यान उड्डाणपूल तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. महासभेतदेखील त्यासाठी मंजुरी देण्यात आली.

उड्डाणपूल साकारण्यासाठी वाहतूक सर्वेक्षण अहवाल नसणे, ठराविक ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून निविदाप्रक्रिया राबविणे, सिमेंटची प्रतवारी वाढविण्याच्या नावाखाली ४४ कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ करणे, स्टार रेट लावून दर वाढविणे यामुळे उड्डाणपूल वादात सापडला. त्रिमूर्ती चौकात उड्डाणपूल साकारताना सिटी सेंटर मॉल चौकातील पुरातन वड वृक्ष तोडण्यावरून पर्यावरण प्रेमी एकवटल्यानंतर तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वडाच्या झाडाला धक्का न लावता उड्डाणपूल तयार करण्यास हरकत नसल्याचे जाहीररीत्या सांगितले.

तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिल्याने तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी मायको सर्कल येथील उड्डाणपूल रद्द केला, तर पवई आयआयटीने त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाची आवश्यकता नसल्याचा अहवाल जुलै २०२२ मध्ये दिल्यानंतर बांधकाम विभागाला पुलाचे काम थांबविण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.

मात्र त्यानंतर देखील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूल रद्द केला, तर ठेकेदार न्यायालयात जाईल व कार्यारंभ आदेश दिल्याने महापालिकेला आर्थिक भुर्दंड बसेल अशी भीती दाखवून पुलाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. कार्यारंभ आदेश दिल्यापासून आतापर्यंत ८० टक्के उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापपर्यंत अवघे सहा टक्के काम पूर्ण झाल्याने उड्डाणपुलाचे काम रद्द करण्याचा निर्णय घेतला.

मोठ्या रस्त्यांचे होणार नियोजन

उड्डाणपुलाचे काम रद्द करताना तरतूद करण्यात आलेला निधी विकासकामांसाठी वळविण्याचे नियोजन सुरू आहे. त्यातही नगरसेवकांची नाराजी नको म्हणून प्रभागनिहाय मोठे रस्ते तयार करण्याचे नियोजन आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदारांना निधीची आवशक्यता असल्याने प्रभागनिहाय विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली, तर प्रशासनाने रस्ते कामांच्या माध्यमातून अर्थात सर्व प्रभागांतून जाणारे रस्ते कामाचे नियोजन सुरू केले आहेत. यासंदर्भात बोलताना शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी रस्ते तयार करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT