11th admissions process esakal
नाशिक

Nashik 11th Admission : विज्ञानकडे ओढा, कला, वाणिज्यला मात्र प्रतीक्षा! अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : जिल्ह्यातील अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून बुधवारपासून (ता.१४) प्रवेश अर्ज जमा करण्याला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या सूचनांचे पालन करून अकरावीचे प्रवेश होणार आहेत. (Class 11th admission schedule announced nashik news)

यावर्षी ५५ ते ६० टक्के घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विज्ञान शाखेलाच प्रवेश हवा असल्याने कट ऑफ वाढेल, त्याचवेळी कला व वाणिज्य शाखेला विद्यार्थी शोधण्याची वेळ काही कनिष्ठ महाविद्यालयांवर येणार आहे. प्रवेस अर्ज करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवासनंतर हे चित्र दिसून आले.

दहावीचा निकाल लागून गुणपत्रक विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू झाली आहे. नाशिक महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यासाठी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जाहीर केले आहे.

बुधवारपासून (ता.१४) अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांचा कल विज्ञानकडे दिसून येत आहे. जिल्ह्यासाठी ऑफलाइन पद्धतीने बेस्ट ऑफ फाइव्ह गुणवत्तेनुसार प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र कमी गुण असले तरी प्रवेश अर्ज नाकारता येणार नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बारावी नापास विद्यार्थ्याला त्याच विद्या शाखेत लगेच पुनर्प्रवेश घेता येईल. मात्र दोन वर्षापेक्षा जास्त खंड असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. सामाजिक आरक्षण, महिला, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आरक्षण इन हाऊस कोटा, अल्पसंख्यांक कोटा महाविद्यालयांना पाळावा लागणार आहे. संस्था व्यवस्थापन कोट्यात पाच टक्के जागा गुणाानुक्रमे देण्याचे अधिकार शाळांना आहेत. नियमबाह्य प्रवेश देण्याचे प्रमाण वाढले असून असे प्रवेश दिल्यास प्राचार्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.

फक्त हवे सायन्स!

दहावीला भरभरून गुण मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेकडे आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विज्ञान शाखांचे प्रवेश फुल होतील. त्याचवेळी कला व काही प्रमाण वाणिज्य शाखा नकोच अशी भूमिका असल्याने महाविद्यालयांना विद्यार्थी शोधण्याची देण्याची वेळही येणार आहे. विशेषता शहरातील विज्ञान शाखेकडे मोठा ओढा असतो, त्याचवेळी ग्रामीण भागातील विज्ञान शाखेच्या काही जागा रिक्तही राहतात.

"अकरावीसाठी विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी पालक व विद्यार्थी विचारणा करत आहे. विज्ञान शाखा शहरात तर फुल होईलच परंतु ग्रामीण भागातही जागा पूर्ण होतील. कला शाखेला मात्र यावर्षी विद्यार्थी मिळवताना कसरत होईल. विज्ञान शाखेतून भविष्यात अनेक संधी असल्याने याकडे कल अधिक आहे." - गोरख येवले, प्राचार्य, संतोष कनिष्ठ विद्यालय, बाभूळगाव

असे असेल सामाजिक आरक्षण

अकरावी प्रवेशासाठी अनुसूचित जाती -१३, अनुसूचित जमाती-७, विमुक्त जाती अ- ३, एनटी ब - २.५, एनटी क- ३.५, एनटी ड- २, विशेष मागासप्रवर्ग- २, इतर मागास प्रवर्ग - १९, आर्थिक दुर्बल घटक- १०, इनहाऊस कोटा-१०, अल्पसंख्यांक कोटा ५०, व्यवस्थापन कोटा ५ टक्के असणार आहे.सर्व महाविद्यालयांना त्याचे पालन करावे लागेल.

असे आहे वेळापत्रक

■ अर्ज छाननी,संवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार करणे - २० जूनपर्यत

■ संवर्गनिहाय गुणवत्ता व प्रतीक्षा यादी प्रदर्शित करणे - २१ जून (सायंकाळी चारपर्यत)

■ पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे - २२ ते २४ जून

■ रिक्त जागांवर दुसऱ्या,तिसऱ्या प्रतीक्षा याद्यांप्रमाणे प्रवेश देणे - २६ ते ३० जून

■ अंतिम प्रवेश यादी जाहीर करणे - १ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT