NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News : शहरात 311 Chronic Spot; पाणी साठणाऱ्या 158 ठिकाणांची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा

NMC News : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणी साठण्याच्या कायम तक्रारी असणाऱ्या २११ क्रॉनिक स्पॉट निश्चित केले आहे. त्यापैकी १५८ ठिकाणांची लक्ष देऊन स्वच्छता चालविली आहे.

उर्वरित ५३ ठिकाणांची चालू आठवड्यात स्वच्छता केली जाईल, असे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गोदावरीसह अनेक उपनद्या आणि नाल्या असलेल्या नाशिक शहरात बहुतांश नैसर्गिक नाल्यांची वाट लागली आहे. (Cleaning of 158 water storage sites chronic spot by nmc nashik news)

तर अनेकांवर बांधकाम होऊन पक्क्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. परिणामी, पावसाचे पाणी निघून जाण्याचे मार्ग कमी कमी होत चालले आहे.

पावसाळी नाल्याची उपाययोजना केली असली तरी, बुजविलेल्या नैसर्गिक नाल्यांपेक्षा महापालिकेने केलेल्या पावसाळी भूमिगत गटाराची संख्या अतिशय तोकडी आहे. त्यात चौफेर डांबरीकरण आणि कॉक्रिटीकरणामुळे जमिनीत पाणी मुरण्याचा भूभाग जवळजवळ नष्ट झाला आहे.

त्यामुळे शहरभर पडणारे पावसाचे पाणी जमिनीवर साचून थेट उताराच्या मार्गाने गोदावरीचा रस्ता धरते. या दरम्यान अनेक ठिकाणी ते धोकादायक पद्धतीने साचून लोकांची तारांबळ उडते. अशी पावसाचे पाणी साचून गैरसोय होणारी ठिकाणी शोधून त्यावर उपाययोजना करण्याची मोहीम महापालिकेकडून सुरु आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे पावसाळ्यात पाणी निचरा जलद गतीने होईल असा महापालिकेच्या बांधकाम विभागाचा दावा आहे.

दरवर्षीच नालेसफाई, पावसाळी गटारीच्या स्वच्छतेच्या तयारीचे महापालिका यंत्रणेकडून दावे केले जात असले तरी पावसाळ्याला मात्र नेहमीच पितळ उघडे पडते. मध्यवस्तीसह गावठाण भागात पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचते. दहीपूल, कॉलेज रोड, गंगापूर रोड, नाशिक रोड, बोधलेनगर, चिडे मळा, बजरंगवाडीपासून महापालिकेच्या रामायण निवासस्थानही अपवाद नाही.

यंदा अशा पाणी साठणाऱ्‍य‍ा ठिकाणांवर बांधकाम विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मागील महिन्यात शहरातील अशा ठिकाणे शोधून (क्रॉनिक स्पॉट) त्यांची यादी निश्चित करण्यात आली. शहरातील सहाही विभाग मिळून एकूण २११ ठिकाणे आहेत. जोरदार पाऊस झाल्यास या ठिकाणी काही मिनिटात चेंबर तुंबून गुडघाभर पाणी साचते.

त्यामुळे वाहतूक विस्कळित होते व अपघातही वाढतात. ही समस्या निकाली काढण्यासाठी स्वच्छत‍ा मोहीम राबवीत महापालिकेकडून गाळ, साचलेला कचरा जेसीबी लावून गोळा केला जात आहे. तुंबलेले चेंबर ढापे उघडून पावसाळी गटारी साफ करण्यात येत असल्याने पाणी साचून खोळंबा होण्याचे प्रकार यंदा कमी होईल, असे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे.

विभागनिहाय स्थळे व स्वच्छता

विभाग संख्या- स्वच्छता- शिल्लक

पूर्व - २६- १८- ८

पश्चिम - २४ - १६ - ८

पंचवटी - २४ - २०- ४

नाशिक रोड - ३९ - २५- १४

सिडको - ६७ - ५७- १०

सातपूर - ३१- २२- ९

एकूण २११- १५८- ५३

वीज गेल्यास...

पावसाळ्यात वीज जाण्याचे प्रकार वाढतात. वीज गेल्यास ग्राहकांना २४ तास मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यासह महावितरणचे ॲप, संकेतस्थळ तसेच नोंदणीकृत मोबाईलवरून महावितरणच्या ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस् कॉल दिल्यास तक्रार नोंदविता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT