Guardian Minister Dada Bhuse inaugurating the Cleanliness Hi Seva Campaign by offering garland to the statue of Mahatma Phule Jotirao Phule at Mosampool Chowk. esakal
नाशिक

Nashik News: महापालिकेची स्वच्छता ही सेवा अभियानद्वारे चमकोगिरी! शहरात कचऱ्याचे ढिगारे; दुर्गंधीचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : स्वच्छ भारत आभियान-२ १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. १) सकाळी दहा ते अकरा या कालावधीत ‘एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान’ हा उपक्रम राबविण्यात आला.

शहरातील २१ ठिकाणी हा उपक्रम राबविला गेला. तथापि महापालिकेची स्वच्छता ही सेवा अभियान मोहीम चमकोगिरी ठरली. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे व दुर्गंधीचे साम्राज्य आहे.

मुळातच नेहमीच स्वच्छ असणाऱ्या प्रमुख चौक व रस्त्यांवर ही मोहीम राबविण्यात आली. प्रशासनाने मोहिमेत २५ टन कचरा जमा केल्याचे सांगितले असताना २५ टन कचरा शहरात अद्यापही अस्ताव्यस्त पडला आहे. (Cleanliness of Municipal Corporation through Seva Abhiyaan garbage heaps in city Empire of Stinks Nashik News)

स्वच्छता मोहीम संपुष्टात आली असली तरी महापालिका प्रशासनाने प्रामाणिकपणे वॉर्ड, प्रभाग व विभागनिहाय स्वच्छता मोहीम राबवावी.

मनपाने श्रमदानाचे आवाहन केले असले तरी स्वच्छतेबाबत प्रशासनावर असलेला रोष पाहता या मोहिमेत सामान्य नागरिक फारसे सहभागी झाले नाहीत.

मोहिमेंतर्गत महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनपातर्फे २१ वार्डांमध्ये एकाच वेळी सकाळी दहा ते अकरा या वेळेत २१ ठिकाणी स्वच्छता नियोजन करण्यात आले. मोसमपूल परिसरात पालकमंत्री दादा भुसे या मोहिमेत सहभागी झाले.

आयुक्त भालचंद्र गोसावी, अतिरीक्त आयुक्त नुतन खाडे, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, सचिन महाले, आरोग्याधिकारी डॉ. जयश्री आहेर, लेखापरीक्षक शेखर वैद्य, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी बळंबत बाविस्कर,

भरत सावकार, प्रमुख स्वच्छता निरीक्षक एकबाल जान मोहमद, आनंदसिंग पाटील, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, शहर समन्वयक अक्षय थोरात आदींसह अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त, महिला बचत गट व युवक संघटना यांच्या सहकार्याने मोसमपुल महात्मा गांधी पुतळ्यापासून, छत्रपती शिवाजी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मोहिमेत २१ घंटागाड्यांमार्फत जमा झालेला कचरा उचलण्यात आला. २५ टन कचरा उचलण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मोहीम राबविली असताना शहरात स्वच्छतेच्या, दुर्गंधीचे साम्राज्य, कचऱ्याचे ढिगारे व गटारी नियमित स्वच्छ न केल्याच्या शेकडो तक्रारी आहेत.

शहरात येथे झाली स्वच्छता

सोमवार बाजार, रावळगाव नाका, द्याने-रमजानपुरा, रमजानपुरा नागरी आरोग्य केंद्र, बतुल पार्क, दरेगाव जुना महामार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नवीन बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज जिमखाना, मसगा महाविद्यालय मैदान,

नवीन वसाहत उद्यान, बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुल, महात्मा फुले भाजी मार्केट, मनपा शाळा क्रमांक १४, मुशावरत चौक, मदनी रोड, चुना भट्टी चौक, राजा नगर, भुईकोट किल्ला, नांदेडी हायस्कुल, रौनकाबाद उद्यान, मास्टर नगर, झांजेश्‍वर मंदिर परिसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT