Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लाचखोर लिपिक गजाआड; शाळेच्या शिपायाकडून घेतली 50 हजारांची लाच

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : गेल्या आठ महिन्यापासून एका शाळेत शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्याने वेतन मिळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव शाळेमार्फत पाठविला होता.

त्यासाठी उपसंचालक कार्यालयाच्या कनिष्ठ लिपिकाने ५० हजारांच्या लाचेची मागणी केली असता, ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ अटक केली.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Clerk in Deputy Director Education Office arrested 50 thousand bribe taken from school constable Nashik Crime)

दिगंबर अर्जुन साळवे (कनिष्ठ लिपिक, शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक) ५५, रा. टाकळी, भीमशक्ती नगर, नाशिक) असे लाचखोर कर्मचार्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत 13 डिसेंबर 2019 पासून 31 डिसेंबर 2022 पर्यंत शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते.

त्यानंतर शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते 1 जानेवारी 2023 पासून ते आजपर्यंत सदर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही.

सदर वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे.

सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक साळवे याने गेल्या ८ तारखेला तक्रारदाराकडे पंचासमक्ष 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत ‘लाचलुचपत’तर्फे पडताळणी केली. त्यानुसार, बुधवारी (ता. १३) उपसंचालक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला.

दुपारी अडीच-तीन वाजेच्या सुमारास लाचखोर साळवे याने पंचासमक्ष शिक्षण उपसंचालक कार्यालयात दुपारी लाचेची ५० हजाराची रक्कम स्वीकारली. त्यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने साळवे यास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अनिल बडगुजर, मनोज पाटील, दिपक पवार, शितल सूर्यवंशी यांनी सदरची कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT