Climate Change : एकाच दिवसात काही वेळ पावसाळा, काही वेळ उन्हाळा, तर काही वेळेसाठी हिवाळा अशा तिनही ऋतूंची अनुभूती सध्या सिन्नरवासियांना येत असून, सध्या कोणता ऋतू सुरू आहे? असा खोचक प्रश्न त्यामुळे सर्वसामान्यांपासून अनेक जण विचारत आहेत. (Climate Change Experience 3 seasons in one day Changes in nature affect all elements nashik news)
निसर्गातील या चमत्कारीक बदलांमुळे नागरिकांना एकाच दिवशी तिन्ही ऋतुंचा अनुभव येत आहे. त्यानुसार अनेकांना निसर्ग प्रकोपाचा सामना करावा लागत आहे.
मनुष्याप्रमाणेच पशु-पक्ष्यांनाही यंदा ऐन उन्हाळ्यात प्रखर उन्हाचा नव्हे, तर बरसणाऱ्या गारा आणि सततच्या पावसाचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरीच नव्हे, तर वन्यप्राणी आणि सामान्य नागरिकांनाही या बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे.
यंदा तापमान कधी जास्त, तर कधी कमी होत असून, रात्रीच्या वेळी थंडीचाही अनुभव येत असल्याने या बदलांमुळे शास्त्रज्ञही विचलित झाले आहेत.
उष्णतेची लाट अन् गारपीटही
साधारणत: एप्रिलमध्ये उष्णतेची लाट येत असते. यंदा मध्यंतरी अशी लाट आली अन् गेलीही. त्यामुळे जनजीवन प्रभावितही झाले. रोज मजुरीसह शेत-शिवारातील पिकांनाही अतिउष्णतेच्या लाटेचा फटका बसला.
मात्र हे सारेकाही अत्यल्पकाळापुरते मर्यादित राहिले. विशेषत: या काळात अवकाळी पाऊस, सोसाट्याचे वारे अन् गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
यंदा सर्वाधिक नुकसान
गारपिटीमुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती हलाखीची झाली. रब्बीसह उन्हाळी पिकांनाही याचा फटका बसला. यामुळे थोडेथोडके नव्हे, तर हजारो हेक्टरचे नुकसान झाले. अनेक वर्षांच्या इतिहासात गतवर्षी व यंदाही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
परंतु, यंदा अवकाळी पाऊसही सातत्याने बरसला. मागील आठवड्यात गारपीट व वादळी पावसाने अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आता बळीराजाला प्रतिक्षा आहे ती फक्त नुकसान भरपाईची.
भाजीपाला, द्राक्षे, गहू, कांदा आदी पिकांचे यंदा अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले असून, अजूनही काही ठिकाणी पंचनामे सुरू असल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.