Hemant Godse & Rahul Dhikale esakal
नाशिक

Nashik Political News : श्रेयवादावरून शिंदे गट- BJPमध्ये संघर्षाचा नवा अध्याय!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या शिफारशीवरून पंधरा कोटी रुपयांचे कामे मंजूर झाले असताना खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्राचा आधार घेत संबंधित कामे आपण मंजूर केल्याचा दावा केल्याने शिंदे गट व भाजपमध्ये नवीन संघर्षाला तोंड फुटले आहे. (cm eknath Shinde group on creditism new chapter of struggle in BJP Nashik Political News)

यापूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी भाजप आमदारांना निमंत्रित न करता बैठक घेणे असो वा मखमलाबाद येथील रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न असो यावरून भाजप व शिंदे गटात मिठाचा खडा पडला आहे. वरिष्ठांकडून स्थानिक पातळीवर निर्माण होणारे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न होत असताना वाद मिटण्याऐवजी ते वाढतानाच दिसत आहे.

आमदार राहुल ढिकले यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास पंधरा कोटींच्या दहा कामांची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयात यादी सादर करत या विभागाच्या अंदाजपत्रकामध्ये कामे मंजूर करून घेतली.

संबंधित कामे मंजूर झालेली असताना खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्राचा आधार घेत आपल्याच प्रयत्नातून सदरची कामे हिवाळी अधिवेशनात मंजूर झाल्याचा दावा केला. या दाव्यानंतर आमदार ढिकले यांनी आक्रमक पवित्रा घेत खासदार गोडसे यांच्या दाव्याची चिरफाड केली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

माध्यमांकडे त्यांनी केलेली शिफारस व मंजूर कामांची यादी सादर करत गोडसे यांचा दावा चुकीचा असल्याचे पुराव्यासहित सादर केले. ढिकले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप व शिंदे गटात स्थानिक पातळीवर आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदारांच्या माध्यमातून आमदारांच्या काम पळवली जात असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

श्रेयवाद वरिष्ठ पातळीवर जाणार

यापूर्वी मखमलाबाद येथे आमदार ढिकले यांच्या निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याचे उद्‌घाटन खासदार गोडसे यांनी केले होते. त्याचवेळी कामांची पळवापळवी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. हा वाद ताजा असतानाच आता गोडसे यांनी पंधरा कोटींच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने सदरचा श्रेयवाद वरिष्ठांच्या पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात खासदार गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही.

"सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अंदाजपत्रकात जवळपास दहा कामे माझ्या नावावर मंजूर केले. मात्र, खासदार गोडसे यांच्याकडून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. यापूर्वीदेखील मखमलाबाद रस्त्याच्या कामात त्यांनी अशाचप्रकारे घुसखोरी केली होती."

- ॲड. राहुल ढिकले, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT