CM Eknath Shinde statement at formal opening of State Police Sports Competition chance for players to dominate field nashik esakal
नाशिक

State Police Sports Competitions : खेळाडूंनाे तुम्हाला मैदान गाजविण्याची संधी : मुख्यमंत्री शिंदे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मैदानावर खेळत असताना शारीरिक तंदुरुस्ती व सदृढ आरोग्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाची मानसिकता ओळखून डावपेचही खेळावे लागते. खेळात हार-जीत चालूच असते.

परंतु त्यातून खेळाडूवृत्ती विकसित होत असते. याच खेळाडूवृत्तीमुळे खेळाडूंना प्रत्यक्ष पोलीस दलात काम करताना उपयोग होत असतो.

त्यामुळे पोलीस खेळाडूंना अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या कलाकौशल्याने नैपूण्य दाखवून मैदान गाजविण्याची संधी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (CM Eknath Shinde statement at formal opening of State Police Sports Competition chance for players to dominate field nashik news)

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे सुरू असलेल्या ३४व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या औपचारिक उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, सुहास कांदे यांच्यासह राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलिस दलाचे अपर महासंचालक चिरंजीव प्रसाद, डॉ. निखिल गुप्ता, विशेष पोलिस महानिरिक्षक (प्रशासन) डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्पर्धेत सातत्य ठेवणे गरजेचे असून प्रामाणिकांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करण्याचे काम पोलिस करतात. शारीरिक बळ, जिद्द, चपळाई, कौशल्य वापरुन पोलिस तपास करतात. त्याच पद्धतीने पोलिस खेळाडूंनी खेळातही प्राविण्य मिळवावे.

या सामूहिक खेळांमुळे अधिकारी व अंमलदारांतील भेदभाव नाहीसा होऊन सारे एक परिवार म्हणून खेळतात. ही बाब महत्त्वाची आहे. यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळते. जिद्द, जिगर, साहस ही महाराष्ट्र पोलिसांची मान उंचविणारी अभिमानास्पद बाब आहे.

मुंबई पोलिसांनी जीवाची बाजी लावून अतिरेकी हल्ला परतावून लावल आहे. शासन नेहमीच पोलिसांच्या पाठीशी उभे असून, सर्वसोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व मशालीने क्रीडा ज्योत प्रज्जवलित करत स्पर्धेचे उद्‌घाटन झाल्याची घोषणा केली.

प्रास्ताविकपर स्वागत मनोगतातून राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलिस क्रीडा स्पर्धेचा आजपर्यंतचा प्रवास सांगितला. २०१४ नंतर यावर्षी यजमानपदाची संधी पुन्हा नाशिकला मिळाल्याचे सांगितले.

प्रारंभी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या पोलीस संघांनी शानदार संचलन केले. त्यानंतर आदिवासी नृत्यासह शानदार सांस्कृतिक कार्यक्रम झाले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी आभार मानले.

सायबर लॅबसाठी ८३७ कोटी

सायबर गुन्हेगारी पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पोलिसांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि संसाधनांची राज्यभरात सायबर लॅबची आवश्यकता आहे.

त्यासाठी शासनाने ८३७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे, पोलीसांचे मनुष्यबळ वाढविण्यासाठी लवकरच १७ हजार पोलीस पदांची भरती केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

बालेवाडीत स्पोर्टस सायन्स

पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात स्पोर्टस सायन्स सेंटर उभारण्याचे नियोजित असून छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठास ५० कोटी रुपये व ४८ हेक्टर जागाही उपलब्ध करून दिली आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी विभागीय ५० कोटी, जिल्ह्यासाठी २५ आणि तालुक्यासाठी ५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे.

खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी रोख पारितोषिकांत पाच पटींनी भरीव वाढ केली आहे. खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यातील खेळाडुंना २८ कोटी रुपयांची पारितोषिके वितरीत केली आहेत. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्य पोलीस दलातर्फे महाराष्ट्र पोलीस अकादमीत वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महिला पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटूंबियांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.

मुख्यमंत्र्यांनी कापला वाढदिवसाचा केक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या (ता.९) वाढदिवस असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलातर्फे महाराष्ट्र पोलीस अकादमीत वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महिला पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटूंबियांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.

यावेळी पालकमंत्री दादा भुसे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Fasal Bima Yojana : रत्नागिरी जिल्ह्याला ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर; आंबा, काजू बागायतदार पात्र

Post Office Schemes : पोस्टाच्या खात्यावर आता मोठ्या रकमेचे व्यवहार,पोस्ट-आयपीपीबीचे खाते करा लिंक

Jammu Kashmir Election: मोदींमुळे पाक सीमेवर शांतता, अमित शहा यांचा दावा; काश्‍मीरमधील घराणेशाहीवर टीका

Sharad Pawar: 1 जागा अन् तिन्ही पक्षांना लढवायची असेल तर..? शरद पवारांनी सांगितली रणनीती, अंतिम उमेदवारांची घोषणा कधी?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात नवरा माझा नवसाचा 2 टीमची हजेरी ; स्पर्धकांबरोबर डान्स आणि धमाल

SCROLL FOR NEXT