Nashik Chief Minister Eknath Shinde while speaking at the entrepreneurs' conference through audio tape on Saturday. On acceptance of co-present esakal
नाशिक

CM Eknath Shinde Statement : उद्योगांना पायाभूत सुविधेसाठी कटिबद्ध

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठक घेत कालबद्धरित्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.१९) दिले.

नाशिक औद्योगिक व लघु व मध्यम उद्योग (एसएमई) यांच्या आयोजित परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे संवाद साधला. (CM Eknath Shinde Statement Committed to infrastructure for industries Nashik News)

याप्रसंगी एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक तथा अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, एसबीआय बँकेच्या महाव्यवस्थापक मेरी सागाया, पश्‍चिम क्षेत्रातील कौन्सिलचे अध्यक्ष श्रीराम महानकालीवार, एसएमईच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीप्ती पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की लॉजिस्टीक पार्क, एक्झिबिशन सेंटर्स, इलेक्ट्रिकल हब, इंडस्ट्रिअल पार्क या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जागा वाटप प्रक्रिया जलद, सुलभतेने केली जाते आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उद्योजकांशी बँकेशी संबंधित येणाऱ्या समस्यांबाबत संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT