CM Relief Fund : गरजू गोरगरिबांना रुग्णसेवेसाठी आर्थिक आधार देण्यासाठी विविध आरोग्य योजना आहेतच, पण त्यातूनही वंचित राहणाऱ्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आधारवड ठरला आहे.
मागील वर्षभरात जिल्ह्यातील सुमारे ५०० वर रुग्णांना चार कोटी चाळीस लाख रुपयांची मदत विविध आजारांच्या उपचारासाठी मिळाली आहे. या सहाय्यता कक्षाकडे सर्वाधिक अर्ज कर्करोगाचे येत आहेत. (cm relief fund Most of applications coming to Help Desk are related to cancer nashik news)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत जाहीर केली जाते.विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते.नव्या उपक्रमानुसार नागरिकांसाठी ही मिस्डकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यानुसार संपर्कासाठी ८६५०५६७५६७ हा नवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर उपलब्ध होतो.
ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीतून मदतीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, किंबहुना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून वैद्यकीय साहित्येला गती मिळाली आहे यासाठी राज्याचे समन्वयक म्हणून कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे काम पाहत आहेत.
मुख्यमंत्री सहायता निधीचे सर्वाधिक येणारे अर्ज हे कर्करोगासाठी आहेत. त्यापाठोपाठ हृदयविकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, डायलिसिस, किडनी विकार या आजारांसाठी अर्ज येतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्ह्याच्या विविध भागातील सुमारे पाचशेवर रुग्णांना देखील वर्षभरात उपचारासाठी सहाय्यता मिळाली आहे. पंचवीस हजारांपासून ते दोन लाखापर्यंत उपचाराला निधी देण्याची तरतुदी या योजनेत आहे.
येवला तालुक्यातही येथील समन्वयक अतुल घटे यांच्या माध्यमातून अनेक गरजूंना या निधीचा लाभ मिळाला आहे. गंभीर आजारांसाठी इतर तीन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालये यामध्ये लाभ मिळू न शकणाऱ्या उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जात आहेत. पूर्वीच्या तुलनेत या योजनेला गती मिळाली आहे.
या आजारांसाठी मिळते साहाय्य
- कॉकलियर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदय रोग, डायलिसिस.
कर्करोग ः केमोथेरपी/ रेडिएशन, अपघात, नवजात शिशूचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण, विविध गंभीर आजार.
ही कागदपत्रे आवश्यक
- विहित नमुन्यातील अर्ज
- वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक/प्रमाणपत्र मूळ प्रत डॉक्टरांच्या सही शिक्यासह.
- अंदाजपत्रक खासगी रुग्णालयाचे असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक
- तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला
- रुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्ड.
- हॉस्पिटल, बँक डिटेल्स
- अपघात झाल्यास MLC/FIR कॉपी
- संबंधित आजाराचे रिपोर्टस्
"गोरगरिबांवर उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आधारवड ठरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक मदत मिळाली असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून योजनेचा लाभ सर्वाधिक गरजूंना मिळाल्याचे आकडे सांगतात. गरजूंनी लाभासाठी संपर्क साधावा." - अतुल घटे, जिल्हा उपाध्यक्ष, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.