dada bhuse, chhagan bhujbal, suhas kande, hemant godse esakal
नाशिक

Market Committee Election : शिंदेंची शिवसेना बाजार समितीच्या रिंगणात? नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलणार

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात सत्तांतर घडविण्याच्या खेळातून अस्तित्वात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यापुढे प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत याची प्रचीती आल्यानंतर, मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना आता बाजार समित्यांच्या निवडणुकीतही उतरण्याच्या तयारीत आहे. मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे, नांदगाव व मनमाड बाजार समितीत आमदार सुहास कांदे, तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार हेमंत गोडसे सक्रिय सहभाग घेऊन पॅनल उतरविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (CM Shinde Shiv Sena in market committee election Political equations in Nashik will change news)

स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपुष्टात येऊनही निवडणुका रखडलेल्या आहेत. त्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने, निवडणुका नेमक्या कधी होतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कोणतीही निवडणूक होत नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभैर झाले होते.

यातच बाजार समित्यांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. साधारण प्रत्येक तालुक्यात असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांकडे ‘मिनी विधानसभा’ निवडणूक म्हणून बघितले जात आहे. बाजार समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तालुक्यातील आजी-माजी आमदारांची, नेत्यांची कसरत असते.

आतापर्यंत या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सहभागी होत असे. राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपनेही रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, देवळा, चांदवड वगळता फारसे यश आले नाही. या प्रमुख पक्षांमध्ये लढाई असताना, आता शिंदेंची शिवसेनाही बाजार समिती निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

मालेगाव बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्री भुसे यांचा दबदबा राहिला आहे. पॅनल निर्मितीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून ते पॅनल उतरविणार हे निश्‍चित मानले जात आहे. नांदगाव बाजार समितीवरही आमदार कांदे यांचे एकहाती वर्चस्व आहे.

त्यामुळे यंदाही कांदे यांच्याकडून पॅनल उभे केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, मनमाड बाजार समितीतही ते लक्ष घालण्याची शक्यता आहे. खासदार गोडसे यांनी मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आजवर लक्ष घातलेले नाही. परंतु, शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यापासून त्यांचे राजकीय वजन वाढले आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

याशिवाय त्यांनी साखर कारखाने चालवायला घेतल्यापासून त्यांची सहकारातही एन्ट्री झाली आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीतही गोडसे यांनी उतरावे, असा आग्रह पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. त्यादृष्टीने खासदार गोडसेही चाचपणी करत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

भुजबळही उतरणार रिंगणात?

दरम्यान, माजी पालकमंत्री छगन भुजबळ बाजार समित्यांच्या निवडणुकांपासून अलिप्त राहात होते. येवला बाजार समितीव्यातिरिक्त त्यांनी जिल्ह्यात कुठल्याही बाजार समिती निवडणुकीत फारसे लक्ष घातले नव्हते. यंदा त्यांच्या मतदारसंघातील येवला, लासलगाव, नांदगाव बाजार समिती निवडणुकीत भुजबळांनी आपल्या समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ द्यावे, अशी मागणी होत आहे.

त्यामुळे भुजबळ यांच्याकडून प्रामुख्याने या तीन बाजार समित्यांच्या निवडणुकीत लक्ष घातले जाण्याची शक्यता आहे. भुजबळ यांनी लक्ष घातल्यास, या बाजार समित्यांची निवडणूक गाजण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT