निफाड (जि. नाशिक) : तारुखेडले येथे आनंदाचा शिधावाटपापासून दिवाळी निघून गेली तरी गावातील २२२ लाभार्थी कुटुंब वंचित होते. लाभार्थी कुटुंब दररोज प्रतीक्षा करत होते. तेथील समाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी याबाबत शनिवारी (ता.२९) रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सविस्तर ट्विट केले. (CM take action after got tweet about Anandacha Shidha at tarukhedle nashik news)
मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ दखल घेतल्याने मंत्रालयातून सूत्र हालले आणि रविवारी (ता.३०) सकाळी सर्व यंत्रणा कामाला लागली. तारुखेडले गावात तालुक्यातील पुरवठा विभाग हजर झाला व त्यांनी स्वतः व गावातील सरपंच पवार यांनी २२२ लाभार्थी कुटुंबांना आनंदाचा शिधाचे वाटप केले. गावातील लाभार्थी कुटुंबांनी याबाबत समधान व्यक्त केले. सर्वांनी गवळी यांचे आभार मानले. तारुखेडले गावातील सरपंच न्यानेश्वर पवार, तंटा मुक्ती अध्यक्ष किरण परसराम जगताप, किराणा मालक किशोर भागवत जगताप, व पुरवठा कर्मचारी व लाभार्थी कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.