DISA Course : कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकाउंटंट्स (सीएमए)ला कायद्यानुसार विशिष्ट अधिकार प्राप्त झाले आहेत. तर, केंद्रिय इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या ‘डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन सिस्टम सिक्युरिटी ऑडिट’ (डिसा) कोर्सला केंद्रीय लेखापरीक्षक म्हणून अधिकार प्रदान केले आहे. (CMA Authorization of Information Security Audit to DISA Course nashik news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
व्यावसायिक, प्रॅक्टिसिंग सदस्यांसाठी हा बदल महत्वाचा आणि स्वगतार्ह असून सीएमएला या क्षेत्रातही कामाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे जाणकारांचे मत आहे. लेखापाल आयटी टूल्सचा वापर करून संपूर्ण आयटी वातावरणात लेखापरीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठी सहभागींमध्ये क्षमता निर्माण करणे हा कोर्सचा उद्देश आहे.
डिसा कोर्समध्ये नवीनतम तंत्रज्ञान, माहिती आश्वासन आणि माहिती व्यवस्थापन कौशल्य यांचे समन्वय साधले आहे. सायबर क्राईमचे वाढते प्रमाण लक्षात घेता, सीएमए प्रॅक्टिशनर्स सिक्युरिटी ऑडिटच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडतील, असेही बोलले जात आहे.
माहिती प्रणाली ऑडिटकरीता ८० टक्के व ८० तास कोचिंग घेणे आवश्यक आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग मॅनेजमेंट ऑडिटकरीता वीस टक्के व २० तास कोचिंग घेणे आवश्यक आहे, अशी माहिती नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए भूषण उत्तम पागेरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.