Coconut tree catch fire esakal
नाशिक

Nashik News : सिन्नरच्या कारवाडीत वीज पडून नारळाचे झाड पेटले

अजित देसाई

Nashik News : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात मंगळवारी सायंकाळी विजांचे प्रचंड तांडव आणि सोसाट्याचा वारा सुरू होता शहा जवळच्या कारवाडी या गावातील संतोष जाधव यांच्या वस्तीवरील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झाडाला आग लागली होती.

ही आग वस्तीवरील तरुणांनी औषध फवारणीच्या ब्लोअर यंत्राच्या साह्याने विझवली. (coconut tree caught fire in Sinnar karwadi due to lightning Nashik News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सिन्नरच्या पूर्व भागात सायंकाळपासून विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता आणि सोबतीला सोसाट्याचा वारा देखील वाहत होता. पावसाच्या हलक्या सरी ठिकठिकाणी पडल्या. कारवाडी- शहा येथील संतोष जाधव यांच्या वस्तीवर घरापासून 50 फूट अंतरावर शेतात उभे असलेल्या नारळाच्या उंच झाडावर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वीज कोसळली.

त्यामुळे झाडाच्या शेंड्याकडील भागात झावळ्या पेटल्या. ही घटना घडली तेव्हा काही मिनिटे अगोदर याच झाडाखाली खेळत असणारी लहान मुले घरात आली होती. सोसाट्याच्या वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडावर लागलेली आग भडकून ठिणग्या उडू लागल्या.

त्यामुळे वस्तीवरील तरुणांनी शेतात पिकांवर औषध फवारण्याचा ब्लोअर पंप ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू करून पाण्याचे फवारे मारत ही आग विझवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT