trimbakeshwar area esakal
नाशिक

Nashik News: त्र्यंबकराजाच्या भरवशावर त्र्यंबकेश्‍वरनगरी! ढासळणारी कायदा अन् सुव्यवस्था

कमलाकर अकोलकर

त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) : ज्योतिर्लिंग, संत निवृत्तिनाथ महाराजांची समाधी आणि हिरवाकंच ब्रह्मगिरी अशा धार्मिक-आध्यात्मिक व पर्यटनदृष्टीने त्र्यंबकेश्‍वर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले आहे. राज्यासह परदेशातून भाविकांचा ओघ वाढत असून, नेहमीपेक्षा चौपट गर्दी झाल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

त्यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. मात्र ढासळणारी कायदा सुव्यवस्था आणि गलिच्छपणा अशा प्रश्‍नांनी मात्र सध्या डोके वर काढले आहे. त्यामुळे त्र्यंबकराजाच्या भरवशावर त्र्यंबकेश्‍वरनगरी दिवस ढकलत असल्याची भावना स्थानिकांमध्ये तयार झाली आहे. (Collapsing law and order at trimbakeshwar area Nashik News)

सुट्यांमुळे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ भल्या पहाटेपासून रात्री दहापर्यंत अव्याहतपणे सुरू असतो. दर्शनासाठी गर्दी उसळते. मात्र पैसे देऊन रस्त्यात तिष्ठत असलेले वृद्ध आणि चिमुकल्यांना तासन्‌ तास ताटकळत राहणे हे कोणत्या व्यवस्थेत बसते, असा प्रश्‍न भाविक उपस्थित करत आहेत.

मुळातच, त्र्यंबकेश्‍वर मंदिर संरक्षित म्हणून ओळखले जाते. यापूर्वी येथे दहशतवादी कारवाईचे लोण पसरू नये म्हणून सुरक्षेची काळजी घेतली गेली. शिवाय सुरक्षा व्यवस्थेबद्दल देवस्थानतर्फे सूचवण्यात येत असतानाही हा प्रश्‍न अनुत्तरितच राहत आहे. मंदिराच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी शंभर मीटरच्या आत प्रतिबंध असताना ठराविक मंडळींकडून बिनदक्कपणे त्याचे उल्लंघन होत आहे.

दर्शनासाठी नवीन पद्धतीने रांग व्यवस्था केली असली, तरीही मर्यादा पडून रांगा पूर्वीसारख्या रस्त्यावर येत आहेत. मंदिरामागे व पूर्व दरवाजा रांगेपर्यंत खासगी वाहने ‘लालसेने’ सोडली जात आहेत. जिथे जागा तेथे ‘पार्किंग’ अशी व्यवस्था वाखाणण्याजोगी बनली आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सामान्यांसाठी कडक नियम

महत्त्वाच्या व्यक्ती, राजकीय नेते किंवा पदाधिकाऱ्यांना सर्वत्र मुभा दिली जाते. त्यांचा लवाजमा प्रवेशकर्ता होत असल्याने संख्येचे बंधन शिल्लक राहत नाही. मात्र सर्वसामान्यांना कडक नियमांचे पालन करावे लागते. मंदिर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

त्यांच्या वेतनाची व्यवस्था भाविकांच्या देणगीतून होते. मात्र भाविकांशी सौर्दाह दाखवावे, असे सुरक्षा रक्षकांना सांगितले जाते की नाही? असा प्रश्‍न भाविकांना मिळणाऱ्या वागणुकीतून उपस्थित होतो.

शिवाय पालिकेच्या कारभाराची चर्चा तशी नवीन राहिलेली नाही. रस्ते फुल, चौफुल्या वेढलेल्या, उत्पन्नासाठी सारे काही अशा प्रकारच्या कारभारामुळे भोलानाथाचा तिसरा डोळा उघडण्याची वाट तर पाहिली जात नसावी, असा प्रश्‍न त्र्यंबकेश्‍वरवासीयांसोबत भाविकांना भेडसावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT