NMC and NCC esakal
नाशिक

Nashik News : साडेसातशे किलो कचऱ्याचे विशेष स्वच्छता मोहिमेतून संकलन; NMC व NCC कॅडेट्सचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, गोदावरी संवर्धन विभाग व सात महाराष्ट्र बटालियन एनसीसी कॅडेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने नंदिनी नदीलगत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या वेळी सुमारे ७५० किलो कचरा गोळा करण्यात आला. पर्यावरण रक्षण हेतूने नदीपात्राचे होणारे प्रदूषण आणि अस्वच्छता रोखण्यासाठी नंदिनी नदीलगत असलेल्या रामदास स्वामी मठाजवळ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (Collection of seven half hundred kilos of waste from special cleanliness drive initiative of NMC and NCC cadets Nashik News)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या मोहिमेदरम्यान महापालिकेचे सफाई कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स यांच्याकडून नंदिनी नदीमधील आणि परिसरातील कचरा, पालापाचोळा, प्लास्टिक गोळा करण्यात आले. सदर मोहिमेकरीता मनपाचे ३० सफाई कर्मचारी आणि एनसीसीचे १५० कॅडेट्स उपस्थित होते.

सदर ठिकाणी महापालिकेतर्फे आठवड्यातील प्रत्येक शनिवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते. परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे याठिकाणी वाहून आलेला कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता. त्यामुळे आजच्या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

गोळा केलेला कचरा घंटागाडीच्या माध्यमातून खतप्रकल्प येथे पाठविण्यात आला. विशेष स्वच्छता मोहिमेकरीता मनपा गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख तथा उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, घनकचरा विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, ७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल तरुण खन्ना, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल रवी व्यास, सुभेदार सचिन पाटील, ७ महाराष्ट्र बटालियनचे कर्मचारी, मनपा विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT