नाशिक : दक्षिणवाहिनी गोदावरी नदीचे पावित्र्य जपून तिचे संवर्धन करण्यासाठी अयोध्या, हरिद्वार, वाराणसीच्या धर्तीवर रामतीर्थ काठावर गोदावरी आरती उपक्रम राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांकडून सूचना आणि अभिप्राय ३१ मार्चपर्यंत मागवण्यात आले आहेत. (Collector gangatharan D appeal to Citizens to register feedback for Godavari Aarti initiative nashik news)
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, की गोदावरी आरती उपक्रमात लोकसहभाग महत्त्वाचा असून सुजाण नागरिक म्हणून येणाऱ्या पिढीला निर्मल स्वच्छ गोदावरी नदीचे रूप दाखविणे आवश्यक आहे.
त्यासाठी सरकारी, निमसरकारी संस्था, शाळा, संगीत व कला प्रशिक्षण संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक, कलावंत आणि खासगी संस्था यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी गोदावरी आरतीचे बोल आणि आरतीच्या अनुषंगाने इतर काही बाबी, सूचना व अभिप्राय कळवायचे आहेत. collector.nashik@maharashtra.gov.in , pwdivisionnashik@gmail.com या ई-मेलवर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना पेटीत कळवायचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.