Maratha Reservation : मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गठित समितीला जात प्रमाणपत्राचे पुरावे २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (Collector Sharma appeal to Submit Maratha Kunbi evidence by 24 nov nashik news)
न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा विभाग व जिल्हानिहाय दौरा निश्चित झाला आहे. २ डिसेंबरला नाशिक विभागीय आयुक्तालयात विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल.
ज्यांच्याकडे १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेखे, उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे उपलब्ध असल्यास त्यांनी जमा करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष कक्षात स्वीकारली जाणार आहेत. राज्य शासनाने पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र देण्याबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे.
या समितीस कागदपत्रे, पुरावे याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व कार्यालयप्रमुख व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना नोंदी शोधण्यासाठी ४ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे पाच लाख नोंदी आढळून आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.