नाशिक : उंचीवरून पडलेल्या बांधकाम मजुराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यातून रुग्ण कोमात गेला होता. नामको रुग्णालयात रुग्णावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, रुग्णाला पुनर्जीवन देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. (Coma laborer resuscitated at NAMCO Success to doctors efforts Nashik News)
पंचवटी परिसरात राहणारा ३८ वर्षीय मजूर गेल्या २६ फेब्रुवारीला काम करत असताना तोल जाऊन खाली कोसळला. यानंतर सहकार्यांनी त्यास नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल करून घेतले नाही.
तातडीने उपचाराची गरज असल्याने रुग्णाला नामको रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आयसीयूमध्ये दाखल करून घेत उपचार सुरू केले. मेंदूत रक्तस्राव झाल्याने रुग्ण बेशुद्धावस्थेत होता. तसेच, शरीराच्या उजव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आलेला होता.
प्राथमिक उपचारांनंतर मेंदूचा सिटी स्कॅन केल्यानंतर मेंदूच्या डाव्या बाजूला रक्तस्राव आढळून आला. मेंदूविकार शल्यचिकित्सक डॉ. सुमीत हिरे यांचा सल्ला घेण्यात आला. रुग्णाची परिस्थिती खालावत असताना, त्याला तातडीने व्हेंटिलेटरचा आधार देण्यात आला.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
डॉ. सुमीत हिरे, मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. अनुज नेहते यांनी दुसऱ्याच दिवशी रुग्णावर यशस्वीपणे मेंदू शस्त्रक्रिया करताना मेंदूच्या आतील रक्तस्राव कमी केला. या संपूर्ण प्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. भूषण वडनेरे, फिजिशियन डॉ. प्रशांत सोनवणे, सीएमओ डॉ. अनिस शेख, शस्त्रक्रिया सहायक डॉ. योगेश गोसावी यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
शस्त्रक्रियेनंतर तीन-चार दिवसांनी रुग्णाने डोळे उघडताना प्रतिसाद दिला. शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी रुग्णाचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. आठवडाभरात सामान्य विभागात हलविण्यात आले.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शासकीय योजनेअंतर्गत त्याच्यावर संपूर्ण उपचार शक्य झाले. त्यानंतर अवघ्या दहा-बारा दिवसांत रुग्ण बोलू-चालू लागला. काही दिवसांपूर्वी रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. नामको ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सचिव शशिकांत पारख व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.