Governo Bhagat Singh Koshyari  SAKAL
नाशिक

नाशिक : सामाजिक आरोग्‍यासाठी एकत्र यावे; राज्यपाल कोश्‍यारी

आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा दीक्षान्त समारंभ ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आरोग्‍य क्षेत्रात नवनवीन संकल्‍पना पुढे येत असून, समाजाच्‍या आवश्‍यकतेनुसार विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत प्रगती साधावी. सामाजिक आरोग्‍याच्‍या हिताच्‍या दृष्टीने सर्व विद्याशाखांनी एकत्र येत भरीव कार्य उभे करावे. त्‍यासाठी विद्यापीठ संशोधन केंद्र व्‍हावे, असे प्रतिपादन राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी बुधवारी (ता. २) केले.

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा दीक्षान्त समारंभ ऑनलाइन पद्धतीने झाला. त्या वेळी ते बोलत होते. प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. डॉ. बलराम भार्गव सहभागी झाले होते. कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर आदी उपस्थित होते.

राज्‍यपाल कोश्‍यारी म्‍हणाले, की कोरोनाकाळात विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षा घेत राष्ट्रीय स्‍तरावर आदर्श निर्माण केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विद्यापीठाने विविध सामाजिक व संशोधानात्मक उपक्रमांना प्राधान्य द्यावे.

नवीन कीर्तिमान भारत घडविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. डॉ. कानिटकर यांनी अहवाल सादर केला. कुलसचिव डॉ. चव्हाण यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले.

नुकसान टाळणार : देशमुख

रशिया व युक्रेन या देशांतील युद्धामुळे परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी राज्य शासन पंतप्रधानांशी राज्‍यपालांमार्फत चर्चा करेल. विद्यापीठाने तसा संशोधनपर अहवाल सादर करावा, अशी सूचना मंत्री देशमुख यांनी केली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पुढील वर्षी विद्यापीठ स्थापनेचा रौप्यमहोत्सव हा विलक्षण योग असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

मनुष्यबळ पुरविण्यात वाटा मोठा : डॉ. भार्गव

वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. डॉ. भार्गव म्‍हणाले, की सामाजिक शास्त्रांसमवेत विज्ञान व तंत्रज्ञान जोडून त्यांचे एकत्रित संशोधन होणे गरजेचे आहे.

स्वदेशी विकास आणि संक्रमणातील विकास या विकासाच्या नव्या वाटा आहेत. याकडे नव्या पिढीने अधिक लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी संशोधनावर लक्ष द्यावे, अशा सूचना त्‍यांनी केल्या. जागतिक आरोग्य क्षेत्रात औषधांपासून ते कुशल आरोग्यसेवा देणारे मनुष्यबळ पुरविण्यात आपलाच वाटा मोठा असल्याचे त्यांनी नमूद केले.

दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

समारंभात विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या दहा हजार ६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली गेली. गुणवत्ताप्राप्त ९८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, एका विद्यार्थ्यास रोख पारितोषिक, संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान केली. आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे ५१३, दंत विद्याशाखा पदवीचे दोन हजार ४१, आयुर्वेद विद्याशाखेचे एक हजार २१, युनानी विद्याशाखेचे ७०, होमिओपॅथी विद्याशाखेचे ९३६, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग एक हजार ७४४, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे ३३६, बीपीटीएच विद्याशाखेचे १५०, बीओटीएच विद्याशाखेचे १४, बीएएसएलपी विद्याशाखेचे ३१, बीपीओ विद्याशाखेचे ३, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेच्या ६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. पदव्युत्तर विद्याशाखेतील एम.डी. मेडिकल विद्याशाखेचे दोन हजार १४१, दंत- ४६१, आयुर्वेद- ९३, होमिओपॅथी- ५३, युनानी- ४, डीएमएलटी- ७८, पॅरामेडिकल- १०४, अलाइड (तत्सम)- २७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT