police esakal
नाशिक

Nashik Police Transfer : प्रभारींची खांदेपालट पण तीही तात्पुरती? प्रभारींच्या काही महिन्यात बदल्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्याचा परिणाम शहर पोलिस आयुक्तालयात दिसून आला आहे. नवीन पोलिस निरीक्षक आयुक्तालयात रुजू होताच, आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालय हद्दीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करताना २१ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. (Commissioner Ankush Shinde transferred 21 police inspector nashik news)

यातील १६ पोलिस निरीक्षकांना प्रभारी नियुक्ती केले आहे. परंतु या नियुक्त्या तात्पुरत्या असल्याचे आदेशात म्हटल्याने पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा मात्र रंगली आहे. दरम्यान, अंबड, उपनगर, इंदिरानगर या पोलिस ठाण्यांच्या प्रभारींची अवघ्या काही महिन्यात बदल्या करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करीत शहर आयुक्तालय हद्दीतील पोलिस निरीक्षकांमध्ये खांदेपालट केली आहे. मात्र ही खांदेपालट करताना काही महिन्यांपूर्वीच प्रभारीपदी नियुक्ती केलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचाही यात समावेश आहे. यामुळे आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.

पोलिस आयुक्तालयात नव्याने पोलिस निरीक्षक रुजू झाले आहेत, तर अजूनही काही अधिकारी रुजू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा बदल्यांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच की काय, आयुक्तांनी खांदेपालट करताना आदेशात ‘तात्पुरती नेमणूक’ असा शब्दप्रयोग केला आहे. यामुळे नियुक्ती केलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या डोक्यावरही बदलीची टांगती तलवार आयुक्तांनी कायम ठेवल्याचे समजते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चुंचाळे चौकीची ‘नियुक्ती’ औटघटकेचीच

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भविष्यात नवीन पोलिस ठाणे म्हणून प्रस्तावित चुंचाळे पोलिस चौकीकडे पाहिले जाते. मोठा गाजावाजा करीत चौकी सुरू करून प्रभारी पोलिस निरीक्षक आणि स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

राजू पाचोरकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. मात्र पाचोरकर यांच्याकडे आता म्हसरूळ पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली असून, चुंचाळे पोलिस चौकीसाठी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे चौकीसाठीची नियुक्ती औटघटकेचीच ठरली अशी चर्चा आहे.

शरमाळे पुन्हा ‘इओडब्ल्यू’ त

उपनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागी शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याकडे उपनगराची तात्पुरती अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. नवीन आदेशात विजय पगारे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून शरमाळे हे पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झाले आहेत.

यांना मिळाले पोलिस ठाणे

* रियाज शेख (सायबर पोलिस ठाणे)
* दिलीप ठाकूर (सरकारवाडा पोलिस ठाणे)
* प्रवीण चव्हाण (देवळाली कॅम्प पोलिस ठाणे)
* अशोक नजन (अंबड पोलिस ठाणे)
* नितीन पगार (इंदिरानगर पोलिस ठाणे)
* गजेंद्र पाटील (भद्रकाली पोलिस ठाणे)
* गणेश न्हायदे (आडगाव पोलिस ठाणे)
* श्रीकांत निंबाळकर (गंगापूर पोलिस ठाणे)
* राजू पाचोरकर (म्हसरुळ पोलिस ठाणे)
* विजय पगारे (उपनगर पोलिस ठाणे)

यांचीही नियुक्ती

* रणजित नलावडे (गुन्हे शाखा युनिट -२)
* शंकर खटके (विशेष शाखा)

* सुभाष ढवळे (वाहतूक शाखा -१)
* भगीरथ देशमुख (आर्थिक गुन्हे शाखा)
* सुभाष पवार (पीसीबी-एमओबी)
* सोहन माछरे (वाहतूक शाखा-२)
* तुषार अढावू (सरकारवाडा पोलिस ठाणे)
* जितेंद्र सपकाळे (पंचवटी पोलिस ठाणे)

पोलिस ठाणे घेतले काढून

* अशोक साखरे (नियंत्रण कक्ष)
* कुंदन जाधव (विशेष शाखा)
* इरफान शेख (पोलिस कल्याण व प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT