nmc google
नाशिक

नाशिक शहरातील सर्व इमारतींचे होणार सर्वेक्षण

विक्रांत मते

नाशिक : शहरातील इमारतींनी ज्या वापरासाठी परवानगी दिली जाते, त्या प्रयोजनार्थ वापर होत नसल्याचा प्रकार आग लागण्याच्या घटनेवरून दिसून आल्यानंतर सर्वच इमारतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगररचना विभागाचे अभियंता, तसेच विभागीय अधिकाऱ्यांना आयुक्त कैलास जाधव यांनी सूचना दिल्या आहेत.


इमारतींच्या पार्किंगमध्ये व्यवसाय होत असल्यास कारवाईच्या सूचना दिल्या. रविवार कारंजा येथील रेडक्रॉस इमारतीच्या तळघरांमध्ये गेल्या आठवड्यात आग लागण्याची घटना घडली होती. या आगीत संगणकीय साहित्य जळून खाक झाले होते. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर इमारतीच्या तळघरांचा पार्किंगसाठी उपयोग न होता. व्यवसायासाठी होत असल्याची बाब स्पष्ट झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त जाधव यांनी सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. शहरात दरवर्षी हजारो इमारतींना परवानगी दिली जाते. इमारतीला परवानगी देताना पार्किंगसाठी जागा सोडणे आवश्‍यक असते, परंतु बाजारपेठांमधील इमारतींमध्ये निवासीऐवजी व्यावसायिक कारणांसाठी वापर अधिक होत असते. तेथील इमारतींच्या तळघरांमध्ये पार्किंगसाठी जागा राखीव असताना त्या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होतो. पार्किंगसाठी जागेचा वापर न होता व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याने तेथे आग लागण्याच्या घटना घडतात. त्याचबरोबर वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतुकीची समस्यादेखील निर्माण होते. त्यामुळे शहरातील सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून ज्या कारणासाठी इमारतीला परवानगी देण्यात आली आहे. त्याच कारणासाठी वापर होत आहे की नाही, हे तपासले जाणार आहे. पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम आढळल्यास कारवाईच्या सूचना दिल्या.


वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर इमारतींचा वापर त्याच कारणांसाठी होत आहे की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. पार्किंगच्या जागेवर व्यवसाय थाटण्यात आल्याने त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT