Nashik Crime News : गिरणारे शिवारात एका महिलेला धडकल्यानंतर महिलेसोबत स्वतःही जखमी झालेल्या एका मद्यपीला रुग्णवाहिकेने उपचारासाठी दाखल केले.
रक्ताने माखलेल्या कपड्यासह आलेल्या या रुग्णांना त्यानंतर उपचार घेतला नाही पण एक आमदार, स्थानिक डॉक्टर, शहरातील पोलिस आणि सिव्हिलचे सुरक्षारक्षक अशा सगळ्यांच्या नावाने लाखोली वाहत तासभर गोंधळ घातला. (commotion of drunkard in district civil hospital premises after accident Nashik News)
दोन महिला पोलिसांनी धाडस दाखवीत त्याला आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र जिथे पुरुष पोलिस अन सुरक्षारक्षकही हतबल होते तिथे त्या बिचाऱ्या तरी काय करणार. त्याने महिला पोलिसांना गुंगारा घेत तशाच रक्ताळलेल्या कपड्यात झोंकाडे खात सिव्हिल ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंत मनमानी केली.
दुदैवी एवढेच सगळ्याच व्यवस्था अंग झटकून काम करणाऱ्या यंत्रणांची मात्र यातून पुरतीच शोभा झाली. गोंधळ घालून गर्दी जमविणाऱ्या यंत्रणेला एक मद्यपी आवरता येईना याचीच रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची खंत होती. जिल्हा रुग्णालयातून नियंत्रण कक्षात दूरध्वनी झाला.
सरकारवाडा पोलिस ठाण्याला दूरध्वनी गेला. ११२ क्रमांकावर दखल घेतल्यानंतर डेल्टा व्हॅन आली. त्यातील पोलिसांनी फिर्यादीचा फोटो काढून तेथूनच तो अपलोड केला आणि गाडी निघून गेली. सरकारवाडा पोलिस जयंतीच्या बंदोबस्तात व्यग्र असावेत.
तेथून दोन महिला पोलिस आल्या. त्यांना तो दाद देईना. पोलिस व्हॅन निघून गेली. पुन्हा त्याचा गोंधळ सुरूच राहिला. धाडस दाखवीत त्या दोन महिलांनी त्याला आवरण्याचा पूर्ण क्षमेतेने प्रयत्न केला.
पण त्यांना दाद न देताच तो सरळ सिव्हिल मधून मुख्य त्र्यंबक रोडने थेट सिग्नलपर्यंत कपडे काढून जात राहिला. अंगावरील रक्त जागोजागी जखमा पाहून बस, खासगी वाहन हळू व्हायची त्याला वाट करून द्यायचे अन हा मात्र तोऱ्यात चालत राहिला. सगळी यंत्रणा त्यांच्या त्यांच्या काम करीत असल्याचे दाखवीत राहिले. पण तो मात्र रुग्णालयात दाखल झालाच नाही.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
सारेच हतबल
गिरणारे शिवारात शुक्रवारी एका दुचाकीस्वाराने महिलेला धडक दिली. त्यात दोघे जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. केसपेपर काढताना मद्यपीचे अशोक खोसकर असे नाव असल्याचे पुढे आले.
तर त्याच्या वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचे नाव ताईबाई फिरके असल्याचे पुढे आले. महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तो दुचाकीस्वार मात्र कुणाचेही ऐकेना. जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीतील पोलिस, सुरक्षारक्षक या सगळ्यांना शिवीगाळ केली.
उपस्थित डॉक्टरांशी अर्वाच्य संवाद साधत त्याने उपचार तर दूरच त्याने दाखल व्हायला नकार दिला. जिल्हा रुग्णालयाने नेमलेले सुरक्षारक्षक हतबल झाले. शासकीय कामकाजात अडथळा आणत असला तरी जिल्हा रुग्णालयाकडून तक्रार येत नाही म्हणून पोलिसही चौकीत प्रतिक्षा करीत राहिले.
नंतर एका संबंधित आमदारांच्या कार्यालयात दूरध्वनी करून माहिती दिली गेली. त्यांनीही माणसे पाठवितो असे सांगून वेळ मारुन नेली. त्यानंतर तास ते दीड तास तसाच गोंधळ सुरू राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.