whatsapp3.jpeg 
नाशिक

सोशल मीडिया ग्रुपवरही संचारबंदी लागू...कारवाईची 'ऍडमिन'लाही भीती!

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (चांदोरी) आजच्या सोशल मीडियाच्या काळात फेसबुक, व्हॉट्‌सऍप हे माहिती आदान-प्रदान करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहेत. परंतु कोरोनाच्या संकटादरम्यान आक्षेपार्ह मजकूर, चुकीची माहिती किंवा संदेश पाठविणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे बहुतांश ग्रुप ऍडमिन यांनी केवळ आपली पोस्ट शेअर करता येईल, अशी सेटिंग केली आहे. परिणामी, ग्रुपवर येणाऱ्या संदेशांचे प्रमाण घटले असून, ग्रुपसुद्धा लॉकडाउन झाल्याचे भासत आहे. 

फक्त ऍडमिनला ग्रुपमध्ये पोस्ट करता येईल, अशी सेटिंग

देशभरात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन व प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. साथरोग प्रतिबंधक व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. अलीकडे प्रत्येक घरात अँड्रॉइड मोबाईल पोचला असून, अनेक मोबाईलधारक विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपचे सदस्य आहेत. काहीजण आपल्याकडे येणाऱ्या पोस्ट कोणतीही शहानिशा न करता इतर व्हॉट्‌सअप ग्रुपवर फारवर्ड करतात. कोरोनाच्या संकटकाळात अफवा, आक्षेपार्ह व द्वेष पसरविणाऱ्या संदेशामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. अशा संकटकाळात अफवा पसरवून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा प्रशासनाने दिला आहे. असे कृत्य करणाऱ्या ग्रुप सदस्यासह ग्रुप ऍडमिनही कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे. पोलिस सायबर शाखा सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत. दरम्यान, बहुतांश व्हॉट्‌सऍप ग्रुप ऍडमिन यांनी फक्त ऍडमिनला ग्रुपमध्ये पोस्ट करता येईल, अशी सेटिंग केली आहे. त्यामुळे येणाऱ्या संदेशाचा भडिमार थांबला असून, ग्रुप शांत झाल्याचे दिसत आहेत. 

...तर ऍडमिनवरही कारवाई 

व्हॉट्‌सऍप ग्रुपवर केवळ ऍडमिनला पोस्ट करता येईल, अशी सेटिंग करूनही जर ग्रुपवर अफवा, आक्षेपार्ह पोस्ट, द्वेष पसरविणारे संदेश प्रसारित होत असतील, तर ग्रुपवर ऍडमिनला सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल. सोबतच ऍडमिनवर कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे ग्रुप ऍडमिन यांनीसुद्धा व्हॉट्‌सऍप ग्रुपवर कोणताही मजकूर पोस्ट करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. 

सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अजूनपर्यंत असा गुन्हा दाखल झालेला नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. - आशिष अडसूळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायखेडा 

अनेकदा ग्रुप मेंबर माहितीची शहानिशा न करता पोस्ट फॉरवर्ड करतात. त्यामुळे ग्रुपची सेटिंग "फक्त ऍडमिन', अशी करून ठेवली आहे. - दीप गडाख, खेरवाडी  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT