Gajanan Maharaj and Agnihotra  esakal
नाशिक

Gajanan Maharaj Paduka : सदिच्छानगरला 2 जानेवारीला सामुदायिक अग्निहोत्र; गजानन महाराजांच्या चैतन्य पादुकांच आगमन

नाशिक येथील भक्त-अनुयायी यांच्या आग्रहास्तव अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशन शिवपुरी, अष्टविनायक मित्रमंडळ आणि माऊली संस्था, राजीवनगरतर्फे सदिच्छानगर येथील क्रिकेट मैदानात २ जानेवारीला दुपारी साडेचारपासून सामुदायिक अग्निहोत्र होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Gajanan Maharaj Paduka : नाशिक येथील भक्त-अनुयायी यांच्या आग्रहास्तव अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशन शिवपुरी, अष्टविनायक मित्रमंडळ आणि माऊली संस्था, राजीवनगरतर्फे सदिच्छानगर येथील क्रिकेट मैदानात २ जानेवारीला दुपारी साडेचारपासून सामुदायिक अग्निहोत्र होणार आहे.(Community Agnihotra on 2nd January at Sadichha Nagar gajanan maharaj paduka nashik news )

याचसाठी निवासी परमसद्‌गुरू श्री गजानन महाराजांच्या श्री चैतन्य पादुकांचे आगमन ३० डिसेंबरला शहरात होणार आहे. विश्व फाउंडेशनचे डॉ. पुरुषोत्तमजी राजीमवाले यांचे संबोधन यानिमित्त आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी आणि माजी नगरसेविका वंदना बिरारी यांनी दिली आहे.

परमसद्‌गुरू हे दत्तावतार श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट गुरुपीठाचे उत्तराधिकारी आहेत. त्यांनी श्री स्वामी समर्थ यांना अभिप्रेत असे धर्मकार्य व त्यांची शिकवण समस्त विश्वभर प्रसारित केली. त्यांनी त्यांच्या सद्‌गुरूंच्या आज्ञेने वेदांच्या पुनरुज्जीवनाची प्रतिज्ञा केली. सर्वांना सहज समजेल अशा भाषेत त्यांनी वेदांचा सार समजावून सांगितला.

तो म्हणजे यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याययुक्त पंचसाधनमर्ग. यज्ञाच्या अंतर्गत सहज सुलभ अशा अग्निहोत्र यज्ञाचे प्रवर्तन केले. नित्य अग्निहोत्र केल्याने भौतिक, आधिभौतिक व आध्यात्मिक उन्नती होईल, असा आशीर्वाद दिला.

गुरुपीठाचे सांप्रत अधिकारी डॉ. पुरुषोत्तमजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंचसाधन व अग्निहोत्राचा संदेश जगभर प्रसारित करण्याचे गुरुपीठाचे कार्य अव्याव्हत चालू आहे. सभा, संमेलने, व्याख्याने, प्रशिक्षण व त्याचबरोबर सामूहिकरीत्या अग्निहोत्रद्वारे प्रभावीपणे अग्निहोत्राची माहिती देणे सुलभ होते. साधकांचा प्रतिसादही फार मोठा असतो. पुणे, मुंबई, बंगलोर, कोइंबतूर आदी ठिकाणी असे सामुदायिक अग्निहोत्राचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत.

अग्निहोत्र म्हणजे काय आणि कसे करावे?

नित्य स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस पिरॅमिडसारखा आकार असलेल्या तांब्याच्या (अथवा मातीच्या) पात्रात गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार केलेल्या अग्नीत, समंत्रक गायीचे तूप माखलेल्या दोन-दोन चिमटी अखंड तांदळाच्या आहुती देणे म्हणजे अग्निहोत्र.
अग्निहोत्र कोणतीही व्यक्ती करू शकते. जातपात, धर्म, भाषा, देश, स्त्री-पुरुष या भेदांपलीकडील ही उपासना आहे.

अग्निहोत्र अत्यंत कमी वेळात म्हणजे ५ मिनिटांत संपन्न होतो. खर्चही फारच कमी येतो. पाच नियम अचूकपणे पाळणे महत्त्वाचे आहे. स्थानिक सूर्योदय- सूर्यास्ताच्या नेमक्या वेळेला अग्नीत आहुती देणे. अर्ध पिरॅमिड आकाराचे तांब्याचे अथवा मातीचे पात्र गोवंशाच्या गोवऱ्याचा अग्नी दोन आहुती. दोन चिमूट अखंड कच्या तांदळाला दोन थेंब गायीचे तूप माखून त्याच्या दोन आहुती अग्नीत द्यायच्या आणि दोन संस्कृत मंत्र म्हणायचे.

आध्यात्मिक पर्वणी

आज जगात ४० पेक्षा अधिक देशांमध्ये हजारो लोक अग्निहोत्र करीत आहेत. अग्निहोत्रामुळे वातावरण शुद्धी, मनःशांती व स्वास्थ, विचारांची स्पष्टता व विकारांचा समतोल, रोगजंतूंचे निरोधन सोबत उर्वरित अग्निहोत्र भस्म हे उत्तम औषध व प्रभावी खत म्हणून अनुभवास आले आहे. पाण्यात मिसळल्यास पाण्याचा पीएचदेखील सुधारतो, असे मानतात.

मनोबल वाढल्याने व्यसनमुक्तीसाठी सहाय्यक असून, अग्निहोत्र वातावरण योगाभ्यास करण्यासाठी उत्तम मानले जाते. अग्निहोत्र जीवनाला उन्नत दिशा देते. अग्निहोत्र सुरू केल्यानंतर जीवनात मोठा सकारात्मक बदल होतो. या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ सर्वांनी येण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT