Nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : अनुदानित लोकसंख्येच्या तुलनेत नवमतदारांची संख्या सव्वा टक्के

नवमतदारांच्या नोंदणीत नाशिक जिल्ह्याने आघाडी घेतल्याचा गवगवा करत निवडणूक विभागाने आपली पाठ थोपटून घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : नवमतदारांच्या नोंदणीत नाशिक जिल्ह्याने आघाडी घेतल्याचा गवगवा करत निवडणूक विभागाने आपली पाठ थोपटून घेतली.

पण प्रत्यक्षात अनुदानित जनगणनेच्या तुलनेत अवघे सव्वा टक्के मतदारांची नोंद झाली आहे. (Compared to subsidized population number of new voters is one percent nashik lok sabha election news)

जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. यात नवमतदारांची सर्वाधिक नोंद नाशिक जिल्ह्यात झाल्याचे सांगितले. १८-१९ या वयोगटातील ४६ हजार ६६४ मतदारांची नोंद करण्यात आली. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिर घेण्यात आले.

त्याचप्रमाणे २० ते २१ या वयोगटातील नव मतदारांचीही नोंदणी झाली. या वयोगटातील ७७ हजार ७१ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. अनुदानित जनगणनेच्या आधारे लोकसंख्या बघितली तर हा आकडा अगदी अत्यल्प आहे. १८ ते १९ या वयोगटात अनुदानित लोकसंख्या ही दोन लाख १९ हजार २३४ इतकी आहे.

त्यापैकी ४६ हजार ६६४ नवमतदार नोंदविण्यात आले. एकूण मतदारांमध्ये त्यांचे प्रमाण अवघे १.२५ टक्के इतके आहे. जिल्ह्यात अजूनही एक लाख ७२ हजार ५७० युवक हे मतदार झालेले नाहीत. जिल्हा प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरल्याचे या आकडेवारीवरून सिद्ध होते.

सर्वेक्षणाने वाढले मतदार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचूक मतदार यादीसाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यापूर्वी १८ ते १९ वयोगटातील मतदारांची टक्केवारी ०.२७ टक्के एवढी होती. हा आकडा जेमतेम सव्वा टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर २० ते २९ या वयोगटातील मतदारांची टक्केवारी प्रारूप मतदार यादीच्या वेळी १७.४५ टक्के एवढी होती. सद्यस्थितीला १८.७५ टक्के इतकी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT