Competence certificate for real estate agent free seminar by sakal siilc nashik news esakal
नाशिक

Sakal SIILC Seminar : रिअल इस्टेट एजंटना सक्षमता प्रमाणपत्र बंधनकारक; आज विनामूल्य सेमिनार

सकाळ वृत्तसेवा

Sakal SIILC Seminar : रिअल इस्टेट एजंट व ग्राहक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी ‘महारेरा’ने आता एजंटना व्यवसाय करण्यासाठी सक्षमता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असेल. (Competence certificate for real estate agent free seminar by sakal siilc nashik news)

महारेरा’च्या या निर्णयासंदर्भात तसेच प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे, यासंदर्भात अधिक माहिती देणारा विनामूल्य सेमिनार शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी सहाला कान्हेरेवाडी (नाशिक) येथे होईल. सेमिनारमध्ये ‘एसआयआयएलसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित माहेश्वरी व ‘उद्योगवर्धिनी’चे संस्थापक-संचालक सुनील चांडक मार्गदर्शन करणार आहेत.

‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ ही रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षणासाठी ‘महारेरा’ची अधिकृत प्रशिक्षण संस्था आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने २० तासांचे हे प्रशिक्षण पूर्ण करून एजंटला प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नव्याने एजंटचे रजिस्ट्रेशन करताना किंवा रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र आता बंधनकारक आहे.

सेमिनार वेळ : २५ ऑगस्ट, शुक्रवार, सायंकाळी ६

ठिकाण : उद्योगवर्धनी कार्यालय, तिसरा मजला,

निर्माण इन्स्पायर, कान्हेरेवाडी,

जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, नाशिक

सेमिनार नावनोंदणीसाठी संपर्क : ९८८१४६६७६८.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT