नाशिक : विवाहानंतर मुल न होणाऱ्या कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत असलेल्या येथील प्रोजेनेसीस फर्टिलिटी सेन्टरमधील उपचाराने एका कुटुंबातील जोडप्याला लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनंतर आई-बाबा होण्याचं सुख मिळणार असल्याने हे जोडपे सुखावले आहे. (Completed family after 12 years of marriage Nashik name highlighted in world Progenesis Fertility Center Nashik Latest Marathi news)
कुलकर्णी दांपत्यांच्या विवाहाला १२ वर्ष झाली. लग्नानंतर काही वर्षे वाट पाहून मुल होत नसल्याने या जोडप्याने वंध्यत्वावरील उपचारासाठी अनेक मोठ्या शहरात उपचार घेतले मात्र आई-बाबा होण्याच स्वप्नं पूर्ण होत नव्हते.
अनेक ठिकाणच्या उपचारानंतरही यश येत नसल्याने हे जोडपे निराश होत होते. काही दिवसानंतर त्यांना डॉ. नरहरी मळगांवकर यांच्या प्रोजेनेसीस हॉस्पिटलमधील उपचाराबद्दल आणि येथील ‘सस्कसेस रेट’ बद्दल माहिती समजली. हे जोडपे लगेच कोविड काळ असूनही एप्रिलमध्ये उपचारांसाठी 'प्रोजेनेसीस’ मध्ये आले.
डॉ नरहरी व डॉ सोनाली मळगांवकरांनी पहिल्याच भेटीत त्यांच्या समस्यांचे निदान करून वर्षभरात बाळ होईल असा दिलासा दिला.
डॉ मळगांवकर यांच्या अनुभवी आणि शास्त्रोक्त उपचार पद्धती, समुपदेशन आणि सांगण्यावरून प्रत्येक गोष्ट जोडप्याने कटाक्षाने पाळून त्यांना प्रतिसाद दिला. 'प्रोजेनेसिस' मधील उपचार, अनुभवी मार्गदर्शनाने कुलकर्णी दांपत्याने उपचार सुरू होण्याच्या पाचव्या महिन्यातच 'गुड न्यूज' मिळाली.
आपल्या घरी बाळ पावलांनी सुख रांगत येणार ही गोष्ट समजताच जोडप्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. ‘प्रोजेनेसिस’ मध्ये पहिल्याच आयव्हीएफ सायकलमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला.
हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये विलक्षण 'पॉझिटीव्हिटी' आहे. इथला स्टाफ खूप चांगला, अनुभवी आणि कोऑपरेटिव्ह आहे, असे मत श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.