latest political news esakal
नाशिक

मंत्र्यांचे भाषण सुरू अन् विद्यार्थी भिजले पावसात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवानिमित्त स्‍वराज महोत्‍सवांतर्गत शुक्रवारी (ता. १२) रॅली काढली. रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे यांच्‍या उपस्‍थितीत हुतात्‍मा अनंत कान्‍हेरे मैदानावर झालेल्‍या समारोप कार्यक्रमात मात्र संतापजनक प्रकार घडला.

पावसाच्‍या हलक्‍या सरी बसरत असताना, एकीकडे मंत्र्यांसह मान्यवरांच्‍या डोक्‍यावर छत्री होत्या. मात्र, विद्यार्थी पावसात भिजत उभे होते. परिस्‍थितीचे गांभीर्य लक्षात न घेता भाषणबाजीत गर्क नेत्‍यांच्‍या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्‍य बिघडण्याची भीती व्‍यक्‍त करण्यात आली. (Concluding program of rally under Swaraj festival politicians under umbrella but students in rain nashik news)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, नाशिक महापालिका, जिल्हा परिषद यांच्यातर्फे रॅलीचा समारोप हुतात्‍मा अनंत कान्‍हेरे मैदानावर झाला.

या वेळी पावसाच्‍या हलक्‍या सरी सुरू असताना, मंत्र्यांसह मान्‍यवरांच्‍या डोक्‍यावर त्‍यांचे सुरक्षारक्षक, स्‍वीयसहाय्यकांनी छत्री धरली. दुसरीकडे विद्यार्थी मात्र पावसात भिजत उभे होते. अशा परिस्‍थितीत कार्यक्रम लवकर संपविण्याऐवजी मनोगत व्‍यक्‍त करण्यास सुरवात केल्‍याने संताप व्‍यक्‍त करण्यात आला.

विद्यार्थी, स्‍वयंसेवकांचा सहभाग

रॅलीत शालेय गणवेशात विद्यार्थी सहभागी झाले होते. एनसीसी, एनएसएसचे स्‍वयंसेवकही उपस्‍थित होते. हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’ची घोषणा देत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचा समारोप उंटवाडीतील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ढोल पथक आणि मराठा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्‍या समूहगीत, राष्ट्रगीताने झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT