nylon manja  esakal
नाशिक

Nashik News : नायलॉन मांजामुळे ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती चिंताजनक

नाशिक शहर व जिल्ह्यात नायलॉन मांजा वापर व विक्रीवर बंदीचे आदेश पोलीस प्रशासनाने काढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक शहर व जिल्ह्यात नायलॉन मांजा वापर व विक्रीवर बंदीचे आदेश पोलीस प्रशासनाने काढले आहेत. असे असताना त्याचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.

सिन्नर तालूक्यात नायलॉन मांज्यामुळे एक 55 वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. (condition of senior citizen is alarming due to nylon manja nashik news )

उत्तम आव्हाड असे जखमी झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे. सिन्नर शहरात दुचाकी वर जात असताना रविवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान या दरम्यान कटलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकल्याने गळ्यापासून त्याला खोल जखम झाली आहे. त्यांना तातडीने सिन्नर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याच्यावर उपचार करण्यात आले.

जखम मोठी असल्याने मोठ्या व्हेन नसा कापलेल्या असताना रक्त प्रवाह बंद करण्यात आलेला असून रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले असल्याचे खाजगी डॉक्टरांनी सांगितले.

तरीही मांजाचा वापर

मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. या पार्श्वभूमीवर ) पोलीस प्रशासनाकडून मांजा वापर व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत. असे असताना देखील विक्री होत असून त्याचा वापर देखील होत असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.

स्नायू आणि नसांना बांधा

''नायलॉन मांजामुळे मनुष्य तसेच पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा मांजा प्राणघातक आहे, कारण तो पक्ष्यांचे स्नायू आणि नसांना कापतो. त्यामुळे त्याचे पंख कापले जातात आणि हाड मोडतात. तसेच नायलॉन मांजावर बंदी असताना याची विक्री कशी काय होते यावर निर्बंध आणलाच पाहिजे. पुढील मोठी घटना झाली तर त्याला जबाबदार कोण राहील?''- अभिषेक अण्णासाहेब गडाख, व्यवस्थापक माध्यमिक लोक शिक्षण मंडळ सिन्नर

मकरसंक्रांतीनिमित्त शहरात होणारी पतंगबाजी आणि नायलॉन मांजाचा वापर यामुळे होणारे अपघात होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी व मफलर तसेच हेल्मेट व दुचाकी हळू चालवावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

SCROLL FOR NEXT