नाशिक : वाहतुकीच्या नियोजनाच्या दृष्टीने शहरातील काही मार्ग एकेरी करण्यात आले. परंतु, वर्दीच्या दुर्लक्षामुळे सर्वच एकेरी मार्ग दुहेरी झाले आहेत, त्यामुळे नियम पाळणांऱ्या वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने अशोक स्तंभ ते रविवार पेठ, रविवार पेठ ते टिळक पथ सिग्नल, मालेगाव स्टॅन्ड ते रामकुंड, सीबीएस ते राजदूत हॉटेल, गोळे कॉलनी ते गंगापूर रोड, शालिमार चौक ते सारडा कन्या विद्यामंदिर हे मार्ग एकेरी करण्यात आले होते. परंतु सद्या या सर्वच रस्त्यांवर दुहेरी वाहतूक सुरू आहे. (Confusion among citizens regarding one way road in city Nashik News)
शहरातील रविवार पेठ ते टिळक पथ सिग्नल हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. हा मार्ग एकेरी असूनही बऱ्याच वेळा वाहतुकीची कोंडी होते, मात्र याही स्थितीत टिळकपथ सिग्नलकडून दुचाकी व रिक्षा थेट रविवार कारंजाकडे जातात.
विशेष म्हणजे टिळक पथ सिग्नलवर वाहतूक शाखेचा पोलिस कर्मचारी उपस्थित असतानाही वाहने बेधडक एकेरी वाहतुकीच्या रस्त्याने शिरत असल्याने नियम पाळणारांची मोठी अडचण होत आहे. या मार्गावर अनेकदा हमरीतुमरीचे प्रसंगही घडत आहे.
गंजमाळ सिग्नल सर्वाधिक बेशिस्त
शहरातील बहुतांशी सिंग्नलवर वाहतूक शाखेचे पोलिस कार्यरत असतात. परंतु, मोठी वर्दळ असलेल्या गंजमाळ (खडकाळी) सिग्नलवर वाहतूक शाखेचा कर्मचारी कधीच हजर नसतो, त्यामुळे या सिग्नलवर अनेकजण सिग्नल नसतानाही बिनधास्त वाहने चालवितात. त्यामुळे सिग्नलचा आदर करत वाहने चालविणाऱ्यांची मात्र पंचाईत होते.
पोलिसांची नियुक्ती गरजेची
या एकेरी मार्गावर एरवी दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असते, परंतु एखाद्या दिवशी वाहतूक शाखेचे कर्मचारी या ठिकाणी कारवाई करताना दिसतात.
एकेरी मार्गावर कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे किंवा या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारून कारवाई करणे हाच या प्रश्नावर तोडगा आहे. मालेगाव स्टॅन्डवरून रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुहेरी वाहतुकीमुळे वादावादीचे प्रसंग घडत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.