Nashik News : तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात एप्रिल २०२२ पासून वितरणात होत असलेल्या गोंधळाबाबत सोमवारी (ता.१७) प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात आले. (Confusion in distribution of nutrition subsidy Indefinite hunger strike of primary teachers union in Nandgaon Nashik News)
नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना अनुदान वितरणात कमालीचा गोंधळ उडाला आहे. काही शाळांना अनुदानच नाही तर काही शाळांना जेमतेम तुटपुंजे तर काही शाळांना नोंदविलेल्या मागणीपेक्षा जादाचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहे.
या सर्व प्रकाराला कोण जबाबदार ? याबाबत जिल्हा तालुका व राज्य स्तरावरील पोषण आहार यंत्रणेत एकमेकांकडे अंगुली निर्देश केला जात असल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १७) महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिक्षक संघाच्या पदाधिकारी व सदस्य यांनी पंचायत समितीच्या बाहेर बेमुदत उपोषण सुरु केले.
काही मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पदरमोड करीत आहार शिजविणाऱ्याची देयके अदा केली. भाजीपाला, किराणा यांची थकबाकी कशी देणार या विवंचनेत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी तालुक्याच्या शिक्षण तसेच शालेय पोषण आहार विभागाच्या लक्षात हा प्रकार आणून देत अनुदानाची मागणी केली.
मात्र प्रशासनाने अनुदानातील विसंगती दूर करण्याऐवजी अनुदान वितरण देयकातील रकमेतील विसंगती कशी व कुणी दूर करावी यावर टोलवाटोलवी सुरु केली.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
यामुळे संतप्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक यांनी याप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर थेट आमरण उपोषण करण्यास सुरवात केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणात राजेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष ललित पगार, जिल्हा संपर्कप्रमुख संजय शेवाळे, पुरुषोत्तम इंगळे, रावसाहेब घुले, अरुण निकम, रवींद्र चौधरी, शांताराम गवळी, सुदाम सूर्यवंशी, नरहरी वाघमारे, संजय वाघ, देविदास काकळीज, भालचंद्र सांळुके, प्रशांत वाघ, प्रवीण पाटील, जयवंत भुतकर, रामदास वाजे, संजय आगोणे,
दगडू चव्हाण, आशुतोष हाटकर, दिलीप घुले, अंबादास हारपडे, गोकूळ निकम, बापू बावा, संदीप पाटील, हरिषचंद्र जगधने, संग्राम ढाकणे, पुरुषोत्तम एरंडे, संजय आहिरे, कल्याणराव घुले, प्रमोद आहेर, अरुण सांळुके, भगवान सानप, आबा सूर्यवंशी, गणेश बागूल, कांतिलाल राठोड, कमलेश पगार, श्याम पवार आदींसह सहभागी झाले होते. नाना कदम, निंबाजी कापुरे, स्वयंपाकी, मदतनीस उपोषणात सहभागी झाले होते.
दहा दिवसात प्रश्न निकाली काढणार
प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने उपोषण सुर करताच गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, पोषण आहार योजना तालुकाप्रमुख किशोर सोनवणे यांनी आंदोलक यांच्यासोबत चर्चा करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
दरम्यान शालेय पोषण आहार योजना जिल्हा लेखापाल विजय मोरे यांनी आहार अनुदानातील देयकाबाबत पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयातील संभाजी पवार यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले. पुढील दहा दिवसात प्रश्न निकाली लागलेला असेल अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते यांनी उपोषण मागे घेतले.
४१ शाळा अनुदानापासून वंचित
तालुक्यातील एकूण प्राथमिक शाळांच्या तुलनेत एकही रुपयाचे अनुदान प्राप्त झाले नाही अशा ४१ शाळा असून त्यांना अनुदानापोटी ३६ लाख ८ हजार ५३६ रुपये येणे बाकी आहे. तसेच मागणी नोंदविलेल्या मात्र तुटपुंजे अनुदान मिळालेल्या शाळांची संख्या ५८ असून त्यांना शासनाकडून ६ लाख ७६हजार २५४ रुपये येणे बाकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.