ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Transfer: ZP आरोग्य विभागाच्या बदल्यांमध्ये गोंधळ; रातोरात होणाऱ्या विनंती बदल्यांवरून आरोग्य सेविका आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

Transfer : जिल्हा परिषदेच्या नियमित बदली प्रक्रीया सुरू असताना दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत रातोरात होत असलेल्या विनंती बदल्यांवरून शुक्रवारी (ता. २६) आरोग्य विभागाच्या बदली प्रक्रियेत गोंधळ झाला.

वर्षोनुवर्षे आदिवासी भागात असलेल्या आरोग्य सेविका, सेवक यांना बदल्यांमध्ये स्थान न मिळाल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आरोग्य विभागाकडून बदल्यांबाबत तयारीच नसल्याने आणखी गोंधळ उडाला.

अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हस्तक्षेप करत, शासन आदेशाप्रमाणे बदली केल्या जातील, असे स्पष्ट करत, गोंधळ घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुनावले. (Confusion in ZP Health Department transfers Health care workers aggressive over overnight transfer requests nashi news)

दिवसभरात आरोग्य विभागांतर्गत विविध संवर्गातील ५९, बांधकाम विभाग ३, पशुसंवर्धन ८, शिक्षण विभाग ६, महिला व बालकल्याण विभागात १५ अशा एकूण ९१ बदल्या झाल्या आहेत.

आरोग्य विभागाच्या बदली प्रक्रीया दरम्यान, विनंती बदल्यांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांनाच संधी दिली जात असल्याने आदिवासी भागातील कर्मचारी संतप्त झाले.

वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करून दररोज बदल्या केल्या जात आहे. गत आठवडाभरात अशा २२ विनंती बदल्या आर्थिक देवाण केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. याच बदल्या करायच्या असतील तर, बदली प्रक्रीया कशाला राबवता अशा प्रश्न उपस्थित केला.

आदिवासी भागात काम करतो याची शिक्षा आम्हाला दिली जात असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. यात एक विधवा आरोग्य सेविका असताना यादीत नाव नसल्याने कर्मचारी महिना आणखीच संतप्त झाल्या. त्यामुळे बदली प्रक्रियेत गोंधळ झाला.

झालेल्या बदल्यांमध्ये आरोग्य सेविका (महिला) २३, आरोग्य सहाय्यक (महिला) संवर्गात २ बदल्या झाल्या. आरोग्य सेवक (पुरुष) संवर्गात २०, आरोग्य सहाय्यक (पुरुष) ८, औषध निर्माण अधिकारी संवर्गात ५, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गात ३, आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार अधिकारी) संवर्गात १ अशा बदल्या झाल्या.

यानंतर, बांधकाम विभाग एकमध्ये तीन बदल्या झाल्या. पशुसंवर्धन विभागात ४ प्रशासकीय तर ४ विनंती अशा एकूण ८ बदल्या झाल्या. शिक्षण विभागात ३ प्रशासकीय व ३ विनंती अशा ६ विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

महिला व बालकल्याण विभागात १४ प्रशासकीय यात, आदिवासातून बिगर आदिवासी ८ तर, बिगर आदिवासातून आदिवासीत ६ बदल्या झाल्या. १ विनंती बदली झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मित्तल यांची नाराजी

आरोग्य विभागातील बदल्यांमधील सावळा गोंधळावरून मित्तल यांनी खुली नाराजी व्यक्त केली. बदल्यांसाठी असणारी माहितीदेखील विभागाने अपडेटच केली नसल्याने त्यांनी विभागास सुनावले. या प्रकरणी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे.

प्रत्यक्षात जिल्हा आरोग्य अधिकारी यांना नोटीस प्राप्त झालेली नव्हती. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विविध संवर्गातील बदली प्रक्रियेत बोटावर मोजण्याइतक्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करण्यात आले होते.

परंतु, आरोग्य विभागातून शुक्रवारी तब्बल १० कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले असून, त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

बदल्यांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत प्रश्न उपस्थितीत झाल्याने आरोग्य विभागाने पुन्हा वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. हर्षल नेहते यांनी सांगितले. यात दोषी आढळणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंदोलनाचाही इशारा

आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या न झाल्याने त्यांनी प्रक्रिया दरम्यान संताप व्यक्त केला. त्यांना तालुका अंतर्गत बदल्यांमध्ये बदली मिळेल असे सांगत शांत करण्यात आले. सोमवारपासून तालुका अंतर्गत बदल्या होत आहे.

यात बदल्या झाल्यास ठिक अन्यथा आम्ही जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.

"अगोदर प्रशासकीय बदल्या १० टक्के आणि विनंती बदल्या १० टक्के असा आदेश होता. मात्र १८ मे २०२३ च्या शासन आदेशाप्रमाणे केवळ ५ टक्केच बदल्या करण्यास परवागनी होती. या आदेशानुसार ५ टक्के विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत."

- डॉ. हर्षल नेहते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT