Ashok Murtadak, Dilip Dater, Salim Shaikh, Anant Sangle, Sachin Sinha, Akshay Khandre Santosh Korde etc. along with banners placed outside the MNS office. esakal
नाशिक

Nashik MNS News: काँग्रेस पाठोपाठ मनसेचीही बॅनरबाजी! राज ठाकरे यांना अजमावून बघण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik MNS News : दीड वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय खेळीमुळे अविश्वासाचे वातावरण तयार झाल्याने त्याचा लाभ उठवण्यासाठी राजकीय पक्षदेखील तत्पर झाले आहे.

काँग्रेसला पर्याय नसल्याची बॅनरबाजी काँग्रेसकडून झाल्यानंतर त्या पाठोपाठ शहरात राज ठाकरे आता एकच पर्याय, अशी बॅनरबाजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करत निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. (Congress followed by MNS too Appeal to Raj Thackeray to give it try banners in city Nashik News)

शिवसेनेत उभी फूट पडून मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला व हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट सहभागी झाला.

सर्वसामान्य नागरिकांना राजकारणाबद्दल तिटकारा निर्माण झाला असताना राजकीय पक्षाकडून ब्रँडिंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काँग्रेसने ‘आता काँग्रेस आणू, अशी घोषणा केली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील शहरात बॅनरबाजी करत ‘आता एकच पर्याय राज ठाकरे यांना अजमावून बघा’, असे आवाहन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर अजूनही वेळ गेली नाही, पुन्हा एकदा राज ठाकरे यांना आजमावून बघा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजीचा सहारा घेऊन राज ठाकरे यांना पुन्हा नाशिकच्या मैदानात उतरविले जात आहे.

पक्षाच्या राजगड कार्यालयात मनसेला आजमावून बघण्याचे आवाहन बॅनरच्या माध्यमातून केल्यानंतर आता संपूर्ण शहरात अशीच बॅनरबाजी केली जाणार आहे.

त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील महापालिकेच्या सत्ताकाळातील विकासकामांच्या माध्यमातून मतदारांना राज ठाकरे यांना आजमावून बघा असे आवाहन केले जाणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT