Congress-organizes-farmers-conference-against-agricultural-laws  esakal
नाशिक

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसतर्फे शेतकरी परिषदेचे आयोजन

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : भाजपा सरकारने मंजूर केलेले शेती विषयक तीन कायदे हे देशातील शेतकरी, शेतमजूर व हरित क्रांती नष्ट करण्यासाठी आणि खाजगी उद्योगपतींना बळ देण्यासाठी आहेत, असा ठपका ठेवत त्यांना विरोध आणि शेती कशी नष्ट होणार आहे त्याची जनजागृती करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी परिषदेच्या माध्यमातून 29 ऑगस्ट रोजी शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोक सहभागी होणार आहे. या शेतकरी परिषदेच्या माध्यमातून भाजपा सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांचे वास्तव जाणून घेण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, कामगार, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे ही यात मोठया प्रमाणात सहभागी होणार आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित

काँग्रेसचे नाशिक शहर(जिल्हा)अध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितले की 29 ऑगस्ट रोजी आयोजित शेतकरी वाचवा शेतकरी परिषदेला राज्यांचे महसूलमंत्री काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेता तसेच नाशिक जिल्ह्याचे संपर्क मंत्री मा.नामदार बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत, तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष शरद आहेर, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, किसान सेलचे अध्यक्ष रामुदादा शिंदे यांनी केले आहे.

या शेतकरी बचाव मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उपस्थित राहून उभे रहावे असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT