Locked Buildings Department Office in Administrative Complex esakal
नाशिक

Nashik: बांधकाम विभागाचे कार्यालय कुलूपबंद! येवल्यात नागरिकांना कामानिमित्त करावा लागतोय 2 किलोमीटरचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा

येवला : नागरिकांची गावभर होणारी भटकंती थांबविण्यासाठी येथे प्रशासकीय संकुल अर्थात मिनी मंत्रालय ही संकल्पना राबविण्यात आली.

यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय वर्षानुवर्ष कुलूपबंद अवस्थेत धूळखात पडून आहे. परिणामी, नागरिकांना बांधकाम विभागाकडे काम असल्यास तब्बल तीन किलोमीटरपर्यंत प्रवास करून कार्यालय गाठावे लागत आहे. (Construction Department office locked Citizens have to travel 2 kilometers for work Nashik psl98)

जनतेच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून प्रांताधिकारी, तहसील, कृषी, पंचायत समिती, नगरपालिका, पोलिस ठाणे, सहाय्यक निबंधक, वनीकरण आदींसाठी सुसज्ज इमारती बांधण्यात आल्या आहेत.

मात्र, आजही यातील काही कार्यालये धूळखात पडली आहेत. अधिकारी या कार्यालयात बसत नसल्याने जनतेला नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासकीय कामात एकजिनसीपणा येण्यासाठी ही कार्यालये उभी राहिली खरी, पण याचा वापर होत नसल्याने ही कार्यालये शोभेची वस्तू झाल्याचा आरोप होतो.

प्रशासकीय संकुलात सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे भव्य कार्यालय बांधले असून, आजतागायत हे कार्यालय याठिकाणी सुरू झालेले नाही.

या कार्यालयातील अभियंता शासकीय विश्रामगृहाच्या कार्यालयातून काम पाहत असल्याने नागरिकांवर ‘प्रशासकीय संकुल ते शासकीय विश्रामगृह’, असे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

येथील अभियंता नाशिक येथून अप-डाऊन करीत असल्याने ते कधीही कार्यालयात हजर राहत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नवनाथ लभडे यांनी केली आहे.

जनतेने कामाबाबत अभियंत्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यास कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने जनतेला मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

अभियंता आपल्या कार्यालयात न बसता शासकीय विश्रामगृह वर्दळ नसलेल्या जुन्या कार्यालयात बसून कारभार हाकत आहेत. तालुक्यात प्रशासकीय इमारत असून, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता बसतात, ती इमारत दीड किलोमीटर अंतरावर आहे.

ही अडचण दूर व्हावी, म्हणून प्रशासकीय संकुलात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय प्रशासकीय संकुलात सुरू करून जनतेची होणारी गैरसोय टाळावी, संबंधित अभियंत्याला कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणीही नवनाथ लभडे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT