Work of Samaj Mandir in progress in Rameshwar Nagar on Gangapur Road.  
नाशिक

Nashik News: नागरिकांचा विरोध असतानाही समाजमंदिराचे बांधकाम; आमदार हिरेंवर नागरिकांची नाराजी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: गंगापूर रोडवरील रामेश्वरनगर येथील नागरिकांचा समाजमंदिराला विरोध असतानाही पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी या भागात समाजमंदिर बांधण्यासाठी निधी दिला. विशेष म्हणजे, नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर समाजमंदिराचे काम वेगाने करण्याच्या सूचना दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

शहरात महापालिकेच्या भूखंडावरील समाजमंदिरे विनावापर पडून असताना आणखी समाजमंदिर नको, त्याऐवजी पार्किंगसाठी जागा द्या, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

गंगापूर रोडवरील रामेश्वरनगरमध्ये एका कॉलनी मोकळ्या भूखंडावरील समाजमंदिराचे काम सुरू आहे. (Construction of community temple despite opposition from citizens nashik news)

वास्तविक या कॉलनीमध्ये अरुंद रस्ता असल्याने त्यात प्रत्येक बंगला वाहनांचे प्रमाण अधिक असल्याने वाहने रस्त्यावर लागतात. या वाहनांमधून रस्ता काढताना पायी चालणाऱ्या नागरिकांची दमछाक होते.

त्यामुळे या भागातील एका मोकळ्या भूखंडावर पार्किंगची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांची आहे. समाजमंदिर झाल्यास पुन्हा पार्किंगची समस्या निर्माण होऊन रहिवाशांना त्रास होईल. त्यामुळे समाजमंदिर नको, अशी मागणी नागरिकांनी आमदार हिरे यांना केली. परंतु समाजमंदिर नको असताना शासनाकडून निधी मंजूर करून या भागात समाजमंदिर उभारणीचे काम सध्या सुरू आहे. एका माजी स्वीकृत प्रभाग सदस्याला काम दिल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक रहिवासी म्हणून नागरिकांचे म्हणणे

- रामेश्वरनगर कॉलनी रोड सहा मीटर आहे. एकापेक्षा अधिक चारचाकी वाहने रस्त्यावर लागत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

- महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये बांधलेली अनेक समाजमंदिरांची दुरवस्था आहे. समाजमंदिरे संस्थांना देण्यासंदर्भातील नियमावली न्यायप्रविष्ट आहे.

- नियमाप्रमाणे कॉलनी रोडवर वाहने पार्किंग करण्यास मनाई आहे. त्यामुळे समाजमंदिर उभारताना पार्किंगची व्यवस्था केली आहे का?

- समाजमंदिर उभारताना नगररचना नियमांचे पालन केले आहे का?

- महापालिकेने ना-हरकत दाखला दिला म्हणून पार्किंगच्या व्यवस्थेबद्दलची जबाबदारी टाळता येईल का?

- महापालिकेच्या कृषीनगर जॉगिंग ट्रॅक येथील बहुउपयोगी चौथरा न करता बंदिस्त असा हॉल करण्याचा अट्टाहास का?

- ओपन स्पेसमध्ये समाजमंदिराचे काम चालू आहे. त्याची संरक्षक भिंत तुटलेली आहे, तसेच काही महिन्यांपूर्वीच केलेल्या पेव्हर ब्लॉक ट्रॅक्रची अवस्था अत्यंत वाईट आहे, याची दुरुस्ती करण्याऐवजी समाजमंदिर का?

- कामाचा आराखडा व कार्यारंभ आदेश सार्वजनिक जागेत सर्वांना दिसावा, अशा पद्धतीने का लावला जात नाही?

"समाजमंदिर नको, अशी आमची मागणी आहे. तसे आमदारांना कळवूनही येथे समाजमंदिराची उभारणी केली जात आहे. नागरिकांनी मागणी केल्यास एखादे काम करता येत नाही. पार्किंगसाठी जागा नसल्याने कॉलनीत रस्त्यावर वाहने लागतात. समाजमंदीदिर झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल." - सचिन महाजन, स्थानिक रहिवासी व माजी नगरसेवक

"स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार समाजमंदिरासाठी निधीची तरतूद करून काम सुरू केले आहे. कामाच्या भूमिपूजनाला स्थानिक सर्व लोक होते. त्या वेळी कोणी विरोध केला नाही. काम सुरू झाल्यानंतर अचानक विरोध कसा झाला. कामाची ‘वर्क ऑर्डर’ दिल्याने काम थांबविता येत नाही." - सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Politics: ...तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील, मुख्यमंत्रीपदावरून BJPच्या बड्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Maharashtra Cabinet: नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंगला सुरुवात; कोणते आमदार गेलेत नेत्यांच्या भेटीला? जाणून घ्या

Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद; सेन्सेक्स 1000 अंकांच्यावर, निफ्टीने पार केला 24,200चा टप्पा

SCROLL FOR NEXT