nashik ozar airport esakal
नाशिक

नाशिक : ओझर विमानतळावर फ्युएल स्टेशन उभारणी

ओझर विमानतळाची धावपट्टी देशात दुसऱ्या क्रमांकाची आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओझर विमानतळाचा समावेश ग्रामीण भागात होत असल्याने इंधन खरेदीवर महापालिका हद्दीपेक्षा कमी कर लागू होतो. त्यामुळे विमान कंपन्यांनादेखील लाभ होणार असल्याने ओझर विमानतळाच्या क्षमतांचा विचार करता ही बाबदेखील महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करताना हा लाभ कंपन्यांना पदरात पाडून घेता येणार आहे.

ओझर विमानतळाची धावपट्टी देशात दुसऱ्या क्रमांकाची आहे. या धावपट्टीवर सध्या सहा विमाने पार्किंग होवू शकतात. त्यापेक्षा अधिक म्हणजे साडेतीन किलोमीटरची धावपट्टी असल्याने बारा मालवाहू विमाने पार्किंग होवू शकतात. त्याचबरोबर नाईट लॅंडिंगची व्यवस्था, एक हजार प्रवासी क्षमतेचे टर्मिनल, मेन्टेनन्स, रिपेरिंग व ओव्हर ऑईलिंग अर्थात एमआरओ व्यवस्था, पर्यटन धोरणांतर्गत सबसिडी याबाबी ओझर विमानतळाच्या क्षमता दर्शविणाऱ्या आहेत. त्याचबरोबर ओझर विमानतळावर पार्किंगसाठी आलेल्या विमानांमध्ये इंधन भरण्याची व्यवस्था केल्यास कंपन्यांना परवडणार आहे. त्याला कारण म्हणजे ओझरचा समावेश ग्रामीण भागात होतो. विमानांसाठी लागणाऱ्या इंधनावरील कर शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कमी असल्याने त्याचा लाभ विमान कंपन्यांना मिळून तोटा कमी करता येणे शक्य आहे.

''ओझर येथील विमानतळावर नाइट लॅंडिंगची व्यवस्था असल्याने पार्किंगसह विमानांचे सर्व्हिसिंग विमान कंपन्यांना परवडणारे आहे. सध्या जी विमानसेवा आहे, ती मर्यादित आहे. दिल्ली, चेन्नई, कोलकतासाठी मुंबईला जाऊन फ्लाइट मिळते. त्यासाठी या मोठ्या शहरांना जोडणारी विमानसेवा मिळाल्यास सामान्य जनतेला सोईस्कर होईल. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनाही फायदा होईल. त्यामुळे नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने एअर कनेक्टिव्हिटी सुलभ होण्याची अत्यंत गरज आहे.'' - वैशाली पिंगळे, अध्यक्षा, निरामय ज्येष्ठ नागरिक संघ, डीजीपीनगर एक

''नाशिकमध्ये सध्या जी विमानसेवा आहे, ती अत्यंत अल्प प्रमाणात आहे. नाशिकमध्ये बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांची मुले- मुली बेंगळुरू, हैदराबाद चेन्नई तसेच इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, दुबई आदी देशांमध्ये शिक्षण अथवा नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे जाण्यासाठी प्रत्येक वेळी मुंबईला जावे लागते व तिथून पुढे प्रवास करावा लागतो. नाशिक शहराच्या नियोजन आराखड्यामध्ये प्राधान्याने एअर कनेक्टिव्हिटीचा समावेश अग्रक्रमाने केल्यास नाशिकहून परदेशात जाण्याची सोय होईल व ज्येष्ठ नागरिकांना अतिशय सोपे होईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.'' - डॉ. शरद पाटील, अध्यक्ष, प्रौढ मित्रमंडळ, कॉलेज रोड, नाशिक.

''ओझर विमानतळ सर्व सोयींनी परिपूर्ण असूनदेखील विमान सेवा परिपूर्ण नाही. मुंबई, दिल्ली, औरंगाबाद या शहरांशी विविध कारणांनी लोकांचा संपर्क आहे. विशेषतः कोर्टाच्या कामासाठी वेळेत जाणे गरजेचे असते, मात्र थेट विमानसेवा उपलब्ध नसल्याने बऱ्‍याच वेळा रस्ते मार्गाने वेळेत पोचणे अवघड होते. कमी वेळात औषध मुंबईहून नाशिकला उपलब्ध करता येत नाही. बऱ्याच दवाखान्यांमधून वेगवेगळ्या शस्त्रक्रिया निष्णात डॉक्टरांमार्फत कराव्या लागतात. काही वेळा मुंबईहून डॉक्टर बोलावले जातात. त्यांना विमानसेवा नसल्याकारणाने नाशिकला येऊन परत जाणे अडचणीचे होते. त्यासाठी विमानसेवा नियमित झाली तर प्रवासात जास्त वेळ वाया न घालवता मुंबई, औरंगाबाद शहरातून डॉक्टर नाशिकला येऊ शकतील. नाशिक-शिर्डी विमानसेवा नियमित सुरू झाली तर फायदा होईल.'' - रमेश डहाळे, अध्यक्ष, दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघ, जेल रोड.

''नाशिकहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांची मुले देश- विदेशात शिक्षण किंवा व्यवसायासाठी स्थायिक झाली आहेत. त्यामुळे मुलांना भेटण्यासाठी अधूनमधून परदेशात जावे लागते किंवा सुखदुःखाच्या वेळी मुलेदेखील इकडे येत असतात. त्यामुळे नाशिकमधून एअर कनेक्टिव्हिटी वाढल्यास ज्येष्ठ नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना विमानप्रवासात ५० टक्के सवलत द्यायला हवी.'' - विठ्ठल सावंत,अध्यक्ष, समर्थ ज्येष्ठ नागरिक संस्था, गंगापूर रोड.

''ज्येष्ठ नागरिकांना मुंबईला जाऊन आंतरराष्ट्रीय विमान पकडणे म्हणजे खूपच जिकिरीचे आहे. कारण मुंबईपर्यंतचा प्रवास वाहनाने करताना थकवा येतो व धावपळ होते. एअर कनेक्टिव्हिटी वाढल्यास कार्गो सेवा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना आपला शेतमाल एक्स्पोर्ट करता येईल. त्यामुळे कृषी व्यवसायालाही फायदा होऊ शकेल. अनेक ज्येष्ठ नागरिकांना परदेशात जाण्याची इच्छा असते. काहींनी साधे विमानतळसुद्धा पाहिलेले नसते. अशा नागरिकांना पर्यटनासाठी परदेशात जाता येईल. लोकप्रतिनिधींनीदेखील यात लक्ष घालून नाशिक शहर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कसे पोहचेल यासाठी पावले उचलायला हवीत.'' - देवराम सैंदाणे, अध्यक्ष, नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक संघ, सिडको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT