Nashik Municipal Corporation esakal
नाशिक

Nashik News : बांधकामाच्या ऑफलाइन परवानगी 30 जूनपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेचे प्रभारी आयुक्त गंगाथरन डी. यांनी ऑनलाइन परवानगी बंधनकारक असल्याचे परिपत्रक दोन दिवसापूर्वी काढले असतानाच राज्य शासनाने आता नव्याने परवानगी संदर्भात आदेश काढले आहे.

त्यात ३० जूनपर्यंत बांधकामाच्या ऑफलाइन परवानग्या देण्यास मंजुरी दिली आहे. बिल्डिंग परमिशन मॅनेज सिस्टीम अर्थात बीपीएमएस सॉफ्टवेअरमधील अडचणीच्या अनुषंगाने शासनाने ऑफलाइन परवानगी दिली आहे. (Construction offline Permit until June 30 Nashik News)

राज्य शासनाने मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी एकीकृत विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे. त्या नियमावलीनुसार बीपीएमएस या संगणकीय प्रणालीद्वारे बांधकाम परवानगी घेणे बंधनकारक आहे.

बांधकामाची परवानगी घेताना वास्तुविशारदांना त्यांच्या कार्यालयात बसूनच परवानगी घेण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मात्र बीपीएमएस या संगणकीय प्रणालीमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ऑफलाइन परवानगी द्यावी लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

१ जुलै २०२२ पासून सर्व प्रकारच्या परवानगी ऑनलाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, यंत्रणा पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित नसल्याने ३१ मार्च २०२३ पर्यंत दोनदा ऑफलाइनसाठी मुदतवाढ देण्यात आली.

त्यानंतर १ एप्रिल २०२३ पासून सर्व प्रकारच्या बांधकाम परवानग्या या ऑनलाइन पद्धतीनेच द्याव्या, अशा सूचना देण्यात आल्या.

मात्र बीपीएमएस प्रणालीतील त्रुटी कायम असल्याने नगर विकास विभागाने पुन्हा ३० जूनपर्यंत ऑफलाइन बांधकाम परवानगी देण्यास मुदतवाढ दिली आहे.

१ एप्रिल २०२३ पासून सदर आदेश लागू करण्यात आले असून बांधकाम व्यवसायिकांना ऑफलाइनसह ऑनलाइनदेखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT