Accident esakal
नाशिक

कसारा घाटात दरीत कोसळला कंटेनर; रेल्वे ट्रॅक थोडक्यात बचावला

पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : मुंबई- नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असतांना शुक्रवारी (ता. ४) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर (MH-15-EV-9826) संरक्षक कठडे तोडून दोनशे ते अडीचशे फूट दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालकाने उडी मारल्याने तो बचावला असून ट्रकचा मात्र पूर्ण चक्का चूर झाला आहे. तसेच मध्य रेल्वेचा मुख्य रेल्वेट्रॅक थोडक्यात वाचला आहे. (Truck accident at kasara ghat)

ट्रक पुर्णपणे चक्काचूर

मुंबईहून नाशिककडे येत असता ट्रक चालक अनिल श्रीकृष्ण रोडे (रा. बीड) हा कसारा घाट चढत असताना हिवाळा ब्रिजच्या अलीकडील वळणावर एका अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करतेवेळी हूल दिल्याने ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कोळशाने अर्धवट भरलेला ट्रक थेट 200 फूट खोल दरीत कोसळला. या दरम्यान वाहनचालक अनिल रोडे यांनी प्रसंगावधान राखत गाडीतून उडी घेत आपला बचाब केला. पण ट्रक थेट दरीत जाऊन रेल्वे बोगद्याच्या कठड्याला अडकला.
या दरम्यान ट्रकचा पूर्ण चेंदामेंदा झाला. ट्रक दरीत गेल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, महामर्ग पोलिस घोटी केंद्र, कसारा पोलिस, टोल यंत्रणाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरीत उतरले आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य...

खोल दरीत गेलेल्या कंटेनरमध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आयरे, स्वप्नील, बाळू मांगे, महामार्ग पोलिस कर्मचारी विटकर हे 250 फूट खोल दरीत उतरले होते. अपघात ग्रस्त ट्रक व परिसरात शोध घेतल्यावर कोणत्याही प्रकारे जखमी वैगरे आढळले नाही. ट्रकचा चालक सुखरूप असल्याने त्याला कसारा पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान खोल दरीत उतरून मदत कार्य करणाऱ्या आपत्ती

मोठा अनर्थ टळला...

कंटेनरचा अपघात खूप भीषण होता, कसारा घाटाच्या खाली 300 फूट खोल दरी लगत रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गांवरुन नाशिक-मुंबई रेल्वे सेवा सुरु असते. अपघातग्रस्त ट्रक मोठ्या वेगात खाली दरीत कोसळला होता. दरीत कोसळलेला ट्रक रेल्वे मार्गावरवर असलेल्या बोगद्याच्या दगडी भिंतीवर अडकला म्हणून पुढील अनर्थ टळला. जर अजून एक फूट जरी ट्रक पुढे गेला असता तर तो ट्रक वरच पडला असता. अजून एक शक्यता नाकारता आली नसती. अपघात झाल्यावर 10 मिनिटांनी या रेल्वे ट्रक वरून मुंबईकडे मेल- एक्सप्रेस रवाना झाली होती. जर मेल एक्सप्रेस व अपघाताची वेळ सारखीच झाली असती तर रेल्वेच्या कम्पनांंमुळे ट्रक थेट रेल्वेवर सुद्धा कोसळला असता व मोठी हानी झाली असती. दरम्यान या प्रकरणी कसारा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT