Nashik News : महापालिकेच्या विल्होळी येथील खत प्रकल्पात असलेल्या कचऱ्याच्या बेड खालून झिरपणारे काळे पाणी थेट पाथर्डी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात शिरत असल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहे.
प्रशासनाने याचा बंदोबस्त केला नाही तर मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. (Contaminated water from fertilizer plant directly in field Aggressive farmers warning of mass movement for measures Nashik News)
शुक्रवारी (ता. २१) दुपारी येथे जमलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख त्र्यंबक कोंबडे, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख धनंजय गवळी, शारदा दोंदे आदींसह येथील शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात प्रशासनाविरोधात भावना व्यक्त केल्या.
खत प्रकल्पात साठवलेल्या कचऱ्याच्या मोठ्या ढिगाऱ्या खालून हा कचरा सडल्यानंतर हे काळे पाणी झिरपण्यास सुरवात होते. नाल्याचे स्वरूप प्राप्त झालेले हे पाणी मोठे पाइप टाकून प्रवाहित केले आहे.
गौळाणे रस्त्यावर राहणाऱ्या पाथर्डी परिसरातील रामदास जाचक, जगन डेमसे, तानाजी जाचक, झुंबर डेमसे, राजू डेमसे, दौलत जाचक ,संतू डेमसे आदी शेतकऱ्यांच्या शेतातून वाहत जात वाडीचे रान येथील वालदेवी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याजवळ मिसळते.
बऱ्याच विहिरींना हे काळे पाणी उतरत असल्याने जनावरेदेखील या पाण्याला तोंड लावत नाहीत. पाण्याचा उग्र वास येतो. डासांची पैदास यामुळे वाढली असून विषारी किडेदेखील निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
रस्त्याने चालत असतानादेखील हे किडे अथवा येथील विषारी माशा चावल्या तर मोठ्या जखमा होतात. पिकांमध्ये हे पाणी शिरत असल्याने भातासह इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत आणि इतर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी दौरा करून ही समस्या किती गंभीर आहे, याचा पडताळा घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वारंवार महापालिकेला याबाबत तक्रार केली असून पाइपद्वारे हे पाणी थेट नेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.
आतापर्यंत स्थानिक नगरसेवकांना अनेकदा सांगितले मात्र तेदेखील फक्त करतो, होईल, करू अशी आश्वासने देतात. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
"महापालिकेने ही समस्या आता गंभीरतेने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचे होत असलेले आरोग्याचे आणि शेतमालाचे नुकसान बघता यावर उपाय होणे गरजेचे आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल."- त्र्यंबक कोंबडे, विभागप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
"भाताच्या उभ्या पिकातून हे दूषित पाणी जात आहे. त्यामुळे भाताचे पीक सडले आहे. अशीच स्थिती इतर पिकांची असून, लहान मुलांच्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे पाणी बाहेर नेऊन टाकणार होते, त्याचे काय झाले माहीत नाही."- जगन डेमसे, शेतकरी
"वर्षानुवर्षं या काळ्या पाण्याची शिक्षा शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदा या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. त्यामुळे प्रशासनाने गंभीरतेने यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत."
- धनंजय गवळी, युवा सेना तालुकाउपप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.