Court Order esakal
नाशिक

Nashik Crime News : वादग्रस्त क्रशरचालकाला साडेतीन कोटींचा दंड!

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव (जि. नाशिक) : गणेशनगर (ता. नांदगाव) येथील बेकायदा गौण खनिज उत्खननप्रकरणी संबंधित क्रशरचालकाला तीन कोटी ४२ लाख ६३ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. विहित मुदतीत दंड न भरल्यास पुढील कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. (Controversial crusher driver fined 3 half crore Nashik Crime News)

गणेशनगर येथील गट नंबर १/११७ मधील दोन हजार ५५२ आर क्षेत्रात दहा हजार ११६ घनमीटर दगडाचे उत्खनन केले असून, त्यातून तीन हजार ५७१ ब्रास काढण्यात आला. त्याचे बाजारमूल्य प्रतिब्रास एक हजार ८०० रुपये याप्रमाणे असून, ते आणि प्रतिब्रास सहाशे रुपयाची रॉयल्टी असे गृहीत धरून दंड आकारण्यात आला आहे.

या क्रशरविरोधात बापू पोद्दार (रा. सिडको, नाशिक) यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये माहितीच्या अधिकारात माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक तलाठी व अन्य यंत्रणेने दाद लागू न दिल्याने हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे आले. त्यांनी जिल्हा खणीकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण व मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांना थेट कारवाईसाठी पाठविले होते.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

गौण खनिज दंड वसुलीएवढ्याच असणाऱ्या या प्रकरणातील वेगवेगळे पदर आता पुढे येऊ पाहात आहेत. हे क्रशर सुरू करताना परवानगी घेतली नसल्याचा ठपका क्रशर मालकावर ठेवण्यात आला असून, ही जागा व सभोवतालचे बहुतांश क्षेत्र सुवर्णनियंत्रण कायद्यामुळे विस्थापित सुवर्णकार बांधवांचे आहे. नव्या शर्तीच्या या जमिनींची सर्रास खरेदी-विक्री प्रकरण २०१३-१४ मध्ये गाजले होते.

पुढे २०१७ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी येवल्याच्या तत्कालीन प्रांताधिकारी व अन्य २३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यात काहींना मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयाने व काहींना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला होता. शिवाय व्यवहार झालेल्या जमिनी पुन्हा शर्तभंग केल्याप्रकरणी शासन जमादेखील झाल्या होत्या. त्याच क्षेत्रातील एका भूखंडावर हे क्रशर सुरू झाल्याच्या तक्रारी होत्या.

दरम्यान, गौण खनिज स्वामित्व वसुलीसाठीचे नांदगाव तालुक्याचे उद्दिष्ट आठ कोटी रुपये निर्धारित करण्यात आले आहेत. त्यातच सध्या तालुक्यातील बेकायदा गौण खनिज उत्खननाचा मुद्दा जिल्हाभर गाजतोय. गौण खनिज स्वामित्व धन वसुलीचे ठरवून दिलेले उद्दिष्ट गाठले जाते अथवा नाही, हा मुद्दा बाजूला पडून अनधिकृत गौण खनिज रोखण्यात असमर्थ ठरलेली यंत्रणा आता परस्परावर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याचे चित्र आहे. मन्याड खोऱ्यातील माणिकपुंज भाग हा गौण खनिजांनी समृद्ध आहे. वाळू, माती, मुरुम, खडी यांच्या उत्खननासाठी म्हणून या भागाला पसंती मिळत असते. मात्र सध्या हा भाग गौण खनिजांच्या अवैध उत्खननाला आणि वाहतुकीला चालना देणारा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT