PSI after convocation ceremony esakal
नाशिक

पोलीस उपनिरीक्षक दीक्षांत सोहळा; खडतर मेहनतीमुळेच पदाला गवसणी

नरेश हाळणोर

नाशिक : पोलीस दलामध्ये (Police Department) नोकरीसाठी तरुण अहोरात्र मेहनत घेतात. तर काही पोलीस दलात जाऊनही फौजदार (PSI) होण्याचे स्वप्न पाहतात. यात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा. परंतु, असे असतानाही खात्यांतर्गंत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षेत खडतर मेहनतीच्या बळावर आज १७१ पोलीस कर्मचाऱ्यांनी आता पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. यात काहींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळविल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासाच होता. (Convocation Ceremony of Police Sub Inspector Nashik News)

नाशिकचा भूमीपूत्राचे पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश

सिन्नर तालुक्यातील वडगाव (लोणारवाडी) येथील मूळचे रहिवाशी असलेले राजू सांगळे २००६ मध्ये नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस भरती झाले. शेतकरी कुटूंबातून आलेले राजू यांनी गेल्या १७ वर्षात जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजाविल्यानंतर स्थानिक गुन्हेशाखेत उत्कृष्ठ कामगिरी बजावली. खून, दरोड्याच्या गुन्ह्यांच्या उकल करण्यात त्यांचे योगदान राहिले. २०११ मध्ये खात्यांतर्गत पहिल्यांदाच पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी यश मिळविले. नाशिक परिक्षेत्रात त्यांची उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. एवढेच नव्हे तर, १२१ व्या तुकडीच्या मानाच्या रिव्हॉल्व्हर किताबाचे राजू सांगळे मानकरी ठरले असून, याशिवाय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा यशवंत चव्हाण किताब व स्टडीजचा किताबही त्यांनी पटकावला आहे.

पारधी टोळीला जेरबंद करणाऱ्या उर्मिला...

मूळच्या सांगलीच्या असलेल्या उर्मिला खोत या २००३ मध्ये सांगली पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाल्या. त्यांचे वडील लष्करात होते. नंतर ते पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. परंतु, त्यांची इच्छा होती की उर्मिला यांनी फौजदार व्हावं. अखेर उर्मिला यांनी अत्यंत खडतर मेहनत व अभ्यास करीत वडलांचे स्वप्न साकार केले. १९ वर्षांच्या पोलीस दलातील सेवेत त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागात काम करताना पारधी गुन्हेगारी टोळीला जेरबंद करण्यात विशेष योगदान आहे. त्यांचे पती जीम ट्रेनर असून, त्यांना एक मुलगी आहे. २०११ पूर्वी दोन वेळा त्यांनी खात्यांतर्गत उपनिरीक्षकासाठी परीक्षा दिली. मात्र थोडक्यात त्यांना हुलकावणी मिळायची. अखेर २०११मध्ये त्यांनी परीक्षेत यश मिळविलेच. या यशामुळे त्या भावूक तर झाल्याच पण कुटूंबियही भावूक झाले होते. उर्मिला या १२१ व्या तुकडीच्या सर्वोत्कृष्ठ ऑलराऊंडर प्रशिक्षणार्थीचा अहिल्यादेवी होळकर किताबाच्या मानकरी ठरल्या.

२६/११च्या हल्ल्याचे साक्षीदार जगदेवप्पा

अक्कलकोट तालुक्यातील सुलेट जवळगे येथील मूळचे रहिवाशी असलेले जगदेवप्पा पाटील हे २००४ मध्ये सोलापूर राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले होते. गेल्या १८ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात जगदेवप्पा यांनी नऊ वेळा नक्षलग्रस्त भागामध्ये सेवा बजावताना उत्कृष्ठ कामगिरीची नोंद केली आहे. तर, मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते ताज हॉटेल येथे बंदोबस्ताला होते. मुंबईचे तत्कालिन अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांचा सुरक्षारक्षक व पोलीस शिपाई राहुल शिंदे हे या हल्ल्यात शहीद झाले होते. त्यांना जगदेवप्पा यांनीच बाहेर आणले होते. २००६ पासून ते खातेंतर्गंत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा देत होते. २०११ मध्ये त्यांना यश मिळाले.

जगदेवप्पा पाटील

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यावेळी गडचिरोली येथे कर्तव्यावर होते. मैदानी तयारीसाठी त्यांना अवघ्या १५ दिवसांचा अवधी मिळाला होता. मात्र कठोर मेहनत व जिद्दीच्या बळावर त्यांनी यश मिळविले. फौजदार झालेले पाहण्याचे भाग्य त्यांच्या वडलांना मिळाले नाही, याची त्यांना खंत वाटते. जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या वडलांचे निधन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT